नाना पाटेकर (Nana Patekar) म्हणजे हिंदी, मराठी सिनेसृष्टीतील अतिशय प्रतिभावान अभिनेते आहेत. त्यांचा अभिनय प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा असतो. अनेक वर्षांपासून ते सिनेसृष्टीत काम करत आहेत. संतापी आणि फटकळ स्वभाव असलेल्या नाना यांचे बॉलिवूडमध्ये अनेक किस्से फेमस आहेत. आता नुकतेच नाना पाटेकर यांनी स्वत:च्या रागीट स्वभावावर भाष्य केलं आहे.
'सिद्धार्थ कन्नन'ला दिलेल्या मुलाखतीत नाना पाटेकरांनी अनेक प्रश्नांची दिलखुलास उत्तरं दिली. नाना पाटेकर म्हणाले, "मी जर अभिनेता झालो नसतो तर अंडरवर्ल्डमध्येच गेलो असतो. हे मी अजिबात गंमतीत बोलत नाहीये. मी याबाबत खूप गंभीर आहे. अभिनयाने मला एक आऊटलेट दिला. माझ्यासाठी अभिनय हा निराशा बाहेर काढण्याचा हा एक मार्ग बनला. मी खूप लोकांना मारहाण केली आहे. त्यापैकी अनेकांची नावे मला आठवत सुद्धा नाहीत. माझी खूप भांडण झाली आहेत". नाना पाटेकरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर त्यांचा अनिल शर्मा दिग्दर्शित वनवास सिनेमा २० डिसेंबरला रिलीज होणार आहे. एका बापाची मन हेलावणारी कहाणी टीझरमध्ये बघायला मिळतंय. 'वनवास'चा टीझर इमोशन्सने भरलेला आहे. 'गदर' आणि 'गदर २' या सुपरहिट सिनेमांचे दिग्दर्शक अनिल शर्मांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय. नाना पाटेकरांचा 'वनवास' बघायला सर्वांना उत्सुकता असेल यात शंका नाही.