नाना पाटेकरांची प्रमुख भूमिका असलेल्या 'वनवास' सिनेमा रिलीज झालाय. २० डिसेंबरला 'वनवास' सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. 'वनवास' सिनेमाचे संमीश्र रिव्ह्यू समोर आले. असं वाटलं होतं की, अनेक महिन्यांनी प्रदर्शित झालेल्या नाना पाटेकरांचा 'वनवास' सिनेमा पाहायला थिएटरमध्ये गर्दी होईल. परंतु असं काही झालेलं दिसलं नाही. 'वनवास' सिनेमाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवलेली दिसत आहे. या सिनेमाने बजेटचा आकडाही अजून वसूल केला नाहीये. पाहूया सिनेमाची कमाई.
'वनवास' सिनेमाची तीन दिवसांची कमाई किती?
'वनवास' सिनेमाच्या कलेक्शनकडे नजर टाकली तर सिनेमाने पहिल्याच दिवशी अवघ्या ६० लाखांचं कलेक्शन केलं. दुसऱ्या दिवशी कमाईत आणखी घट झाली आणि सिनेमाने अवघ्या ५८.३३ कोटींची कमाई केली. तिसऱ्या दिवशी कमाईत काहीशी वाढ झाली असून सैकनिल्कच्या रिपोर्टनुसार सिनेमाने १.३० कोटींची कमाई केली. यामुळे 'वनवास'ची तीन दिवसांची कमाई २.८५ कोटी इतकी झालीय. वनवास सिनेमाचं बजेट ३० कोटी असून कमाईचे आकडे बघता अजूनतरी नाना पाटेकरांच्या या सिनेमाने बजेटचा आकडा ओलांडला नाहीये.
वनवास सिनेमाविषयी सांगायचं तर..
'वनवास' सिनेमाविषयी सांगायचं तर नाना पाटेकरांची सिनेमात प्रमुख भूमिका आहे. तर उत्कर्ष शर्माने या सिनेमात नानांसोबत भूमिका साकारली आहे. 'गदर' आणि 'गदर २' या सुपरहिट सिनेमांचे दिग्दर्शक अनिल शर्मांनी 'वनवास'चं दिग्दर्शन केलंय. वडील- मुलाच्या भावुक नात्याची हृदयस्पर्शी कहाणी 'वनवास' सिनेमात दिसतेय. सिनेमाला प्रेक्षकांचा कमी प्रतिसाद दिसला तरी ज्यांनी सिनेमा पाहिलाय त्यांना आवडलेला दिसतोय.