Join us

नाना पाटेकर यांनी २२ वर्षांपूर्वी 'गदर'बाबत केलेलं भाकीत ठरलं होतं खरं, आता आहे 'गदर २'सोबत हे कनेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2023 12:29 PM

Gadar 2 : स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर ११ ऑगस्टला 'गदर २' चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी नाना पाटेकर यांचे चित्रपटाशी असलेल्या कनेक्शनबद्दल सांगितले आहे.

सनी देओल(Sunny Deol)च्या 'गदर २'(Gadar 2)बद्दल सातत्याने बातम्या येत आहेत. या चित्रपटाच्या टीझरने चाहत्यांमध्ये आधीच चांगलीच क्रेझ निर्माण केली होती. नुकतेच या चित्रपटातील 'उड जा काले कावा' हे गाणे रिलीज झाले. पण आता या चित्रपटाचे दिग्दर्शक अनिल शर्मा (Anil Sharma) यांनीही नाना पाटेकर (Nana Patekar) या चित्रपटाशी जोडल्याचा खुलासा केला आहे. अनिल शर्मा यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून ही माहिती दिली आहे. गदर रिलीज होण्यापूर्वीच नाना पाटेकर यांनी तो ब्लॉकबस्टर घोषित केला होता, असेही त्यांनी सांगितले आहे. यावेळीही त्यांंनी या चित्रपटाचे खूप कौतुक केले आहे.

अनिल शर्मा यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, 'काही क्षण अनमोल असतात. असा हा क्षण आहे. धन्यवाद नाना पाटेकर जी. तुमच्यासारख्या दिग्गज व्यक्तीसोबत काम करताना मला खूप आनंद होत आहे. गदर २ आणि तुमच्या व्हॉईस ओव्हरवरील तुमचे प्रेम अतुलनीय आहे. धन्यवाद आणि मला आठवतंय की गदर १ रिलीज होण्यापूर्वी तुम्ही मला सांगितले होते की तो ब्लॉकबस्टर असेल. यावेळीही तुम्ही प्रेम दाखवले आहे. ओपनिंग पाहिले. झूम झूम, आणि मैं निकला हे गाणे पाहिले, उत्कर्ष शर्माला खूप मिठी मारली, सनी देओलची खूप स्तुती केली, देवाची इच्छा पुन्हा कथेची पुनरावृत्ती होईल असे सांगितले. यावेळीही लोकांचे भरभरून प्रेम मिळेल.

अशाप्रकारे अनिल शर्माच्या गदर २ मध्येही नाना पाटेकरांचे प्रेम पाहायला मिळाले आहे. गदर २ हा चित्रपट ११ ऑगस्टला स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. याच दिवशी अक्षय कुमारचा OMG 2 हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. अशा प्रकारे बॉक्स ऑफिसवर चुरशीची स्पर्धा पाहायला मिळते. पण सध्या तरी नाना पाटेकरांचे शब्द गदर २ च्या टीमला प्रोत्साहन दिले आहे.

टॅग्स :नाना पाटेकरसनी देओल