Join us

नणंद श्वेता बच्चनला ऐश्वर्या रायच्या या सवयीची येते चीड, खुद्द तिनेच शोमध्ये केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2024 9:24 AM

Aishwarya Rai Bachchan And Shweta Nanda : काही दिवसांपूर्वी श्वेता बच्चन करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' या शोमध्ये पाहुणी म्हणून दिसली होती. त्यावेळचा तिचा जुना व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात तिने ऐश्वर्याच्या आवडणाऱ्या आणि न आवडणाऱ्या गोष्टींचा खुलासा केला होता.

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) आणि वहिनी श्वेता बच्चन (Shweta Bachchan) यांच्या नात्याबाबत अनेक प्रकारच्या चर्चा सोशल मीडियावर ऐकायला मिळत असतात. दरम्यान, श्वेता बच्चनच्या जुन्या व्हिडिओंची सोशल मीडियावर खूप चर्चा होत आहे. हा जुना व्हिडिओ करण जोहरच्या चॅट शोमधला आहे ज्यामध्ये श्वेता बच्चन ऐश्वर्या रायबद्दल मोकळेपणाने बोलली होती. त्यावेळी श्वेता बच्चनने सांगितले होते की तिला ऐश्वर्याची कोणती गोष्ट आवडते आणि कोणती सवय आवडत नाही.

काही दिवसांपूर्वी श्वेता बच्चन करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' या शोमध्ये पाहुणी म्हणून दिसली होती. हा जुना व्हिडिओ Reddit ने शेअर केला आहे. 'कॉफी विथ करण' व्यतिरिक्त करिनाच्या शोमध्ये शर्मिला टागोरच्या शोच्या एकत्र केलेल्या क्लिप दाखवण्यात आल्या आहेत. या व्हिडिओमध्ये करण श्वेताला विचारतो की, 'तिला ऐश्वर्याबद्दल काय आवडत नाही आणि तिला कोणत्या गोष्टीची चीड येते?' उत्तरात श्वेता म्हणाली की 'ती एक सेल्फ मेड, सशक्त महिला, खूप चांगली आई आहे. ही गोष्ट आवडते.

ही गोष्ट अजिबात आवडत नाहीयादरम्यान करणने विचारले की, 'तुला तिच्या कोणत्या गोष्टीची खूप चीड येते?' उत्तरात श्वेता म्हणाली की, 'ती कधीच मेसेज आणि कॉलला उत्तर देत नाही. यासोबतच तिच्या वेळेचे व्यवस्थापनही सहन करावे लागते. Reddit च्या या थ्रोबॅक व्हिडिओमध्ये श्वेता बच्चनचे उत्तर पुन्हा एकदा लोकांचे लक्ष वेधून घेत आहे.

श्वेताचा मुलगा अगस्त्यने केलंय बॉलिवूडमध्ये पदार्पणश्वेता बच्चनला दोन मुले आहेत. अगस्त्य नंदा आणि नव्या नवेली. नव्या पॉडकास्ट चालवते तर अगस्त्यने शाहरुख खानची मुलगी सुहाना खानसोबत 'द आर्चीज' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. श्वेता तिच्या दोन मुलांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

टॅग्स :ऐश्वर्या राय बच्चन