आज संपूर्ण देशवासियांनी अयोध्येतील राम मंदिर उद्घाटनाचा ऐतिहासिक सोहळा पाहिला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) हस्ते प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. देशभरातील साधुसंत-महंतांसह विविध क्षेत्रातील दिग्गजांनी सोहळ्याला हजेरी लावली. बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनाही या सोहळ्याचं खास निमंत्रण होतं. महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी अभिषेक बच्चनसह हजर होते. प्राणप्रतिष्ठापना झाल्यानंतर निघताना पंतप्रधान मोदींना बिग बींनी अभिवादन केलं. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
अयोध्येतील भव्य मंदिरात 500 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर रामललाची मूर्ती विराजमान झाली आहे. दुपारी १२ वाजून २९ मिनिटांनी प्राणप्रतिष्ठापना झाली. पंतप्रधान मोदींनी नंर सर्वांना संबोधित केले. तसंच रामभक्तांवर पुष्पवृष्टीही केली. मंदिरातून बाहेर पडताना मोदींनी समोर बसलेल्या सर्व व्हीव्हीआयपींसमोर हात जोडून अभिवादन केले. यावेळी अमिताभ बच्चन यांच्यासमोर येताच ते काही वेळ थांबून बोलले. दोघंही एकमेकांकडे बघून हसले. हा व्हिडिओ काही सेकंदात सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ANI च्या अधिकृत ट्विटर हँडलवर व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.
आज झालेल्या या ऐतिहासिक सोहळ्याचे हजारो प्रत्यक्ष साक्षीदार होते.उद्योग जगतातील दिग्गज मुकेश अंबानी त्यांच्या संपूर्ण कुटुंबासह हजर होते. तर अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, विकी-कतरिना, रणबीर-आलिया, आयुष्मान खुराना, जॅकी श्रॉफ, कंगना रणौत, सचिन तेंडुलकर यांनीही हजेरी लावली. अक्षय कुमार, टायगर श्रॉफ, रोहित शर्मा, विराट कोहली मात्र उपस्थित राहून शकले नाहीत.