Join us

​नर्गिस फाखरी मीडियावर बरसली !!!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2016 8:33 AM

बॉलिवूडमध्ये एखाद्याचे ब्रेकअप झाले की तो विषय सर्वत्र चर्चेचा बनतो आणि मीडिया हाच विषय घेऊन सेलिब्रिटींना विचारणा करतात. काहीजण ...

बॉलिवूडमध्ये एखाद्याचे ब्रेकअप झाले की तो विषय सर्वत्र चर्चेचा बनतो आणि मीडिया हाच विषय घेऊन सेलिब्रिटींना विचारणा करतात. काहीजण या विषयी बोलणे टाळतात, म्हणजे मौन धारण करतात तर काहीजण मीडियावर बरसतात. असाच एक किस्सा घडला नर्गिस फाखरीच्या बाबतीत.   अभिनेत्री नर्गिस फाक्रीला उदय चोप्राशी झालेल्या ब्रेकअप संबंधीचा प्रश्न मीडियाने विचारण्यात आला. असले फालतू प्रश्न विचारु नका असा सल्ला तिने मीडियाला दिला. उदय चोप्राशी ब्रेकअप झाल्यानंतर हा विषय चर्चेचा ठरला आहे.यावर्षी 'हाऊसफुल्ल ३' चित्रपटाचे प्रमोशन अर्धवट सोडून नर्गिस अमेरिकेला गेली होती. उदयसोबत तिचे ब्रेकअप झाल्यामुळेच तिने भारत सोडल्याची चर्चा काही मीडियाने उचलून धरली होती. मात्र कामाचा थकवा आल्यामुळे विश्रांती घेण्यासाठी घरी परतल्याचे नर्गिसने सांगितले होते.'बँजो' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये नर्गिस आणि रितेश देशमुख हजर होते. त्यावेळी उदयसोबतच्या ब्रेकअपचा प्रश्न तिला विचारण्यात आला. त्यावेळी भडकलेल्या नर्गिसने असा फालतू प्रश्न पुन्हा न विचारण्याचा सल्ला दिला. तुम्हाला हा प्रश्न विचारण्याचा अधिकारच नाही, असेही ती म्हणाली.