तुम्हाला 1986 साली आलेल्या ऋषी कपूर आणि फराह नाझ यांचा 'नसीब अपना अपना' चित्रपट आठवतो का? या चित्रपटात ऋषी कपूर यांनी दोन लग्न केली. त्यांचे एक लग्न अरेंज मॅरेज होते तर दुसरं लव्ह मॅरेज झालं होतं. त्यांची पहिली पत्नी जितकी रागीट होती तर दुसरी पत्नी दिसायला सुंदर आणि हुशार होती. सिनेमात अभिनेत्री फराह नाझनं ऋषी कपूरच्या दुसऱ्या बायकोची राधा सिंहची भूमिका केली होती. तर पहिली बायको चंदाची भूमिका अभिनेत्री राधिका सरथकुमार हिनं केली होती.ऋषी कपूर यांनी किशन सिंगची भूमिका साकारली होती. ऋषी कपूर यांची पहिल्या पत्नीची भूमिका साकारणारी चंदा प्रेक्षकांचा खूप आवडली. अभिनेत्री राधिकानं प्रेक्षकांची मनं जिंकली. मुळची साऊथ इंडियन अभिनेत्री असलेल्या राधिकानं बॉलिवूडमध्ये देखील आपली नवी ओळख निर्माण केली.
चंदोच्या भूमिकेतील राधिका लोकांना इतकी आवडली की लोकांनी फराह नाजकडे दुर्लक्ष केले. राधिकाचा लूक, तिची बोलण्याची स्टाईल आणि हेअर स्टाइल आजही प्रेक्षक विसरलेले नाहीत.सिनेमात राधिका म्हणजेच चंदाला तिच्या नवऱ्याचं प्रेम मिळत नाही. सवत म्हणून ती तिचं आयुष्य जगते. फार शेवटी नवऱ्याचं प्रेम तिला मिळतं. अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यात देखील असंच काहीच झालं. जेव्हा तिने आधीच विवाहित आर सरथकुमारशी लग्न केले.
राधिका ही अभिनेता राजगोपालन राधाकृष्णन यांची मुलगी आहे. राधिका बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वीच लग्न करून सेटल झाली होती. 1986 मध्ये तिनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 1985 मध्ये तिचं पहिलं लग्न साऊथचे प्रसिद्ध अभिनेते, लेखक आणि निर्माता प्रताप पोथेंसोबत झाले होते. पण काही महिन्यांनंतर हे लग्न तुटले. राधिकाने हिंदी चित्रपटात पाऊल ठेवले त्याच वर्षी प्रताप पोथेंसोबत घटस्फोट घेतला. यानंतर ती पुन्हा एकदा प्रेमात पडली. प्रताप पोथेनबरोबर घटस्फोट झाल्यानंतर राधिका ब्रिटिश व्यक्तीच्या प्रेमात पडली. रिचर्ड हार्डी असं तिच्या दुसऱ्या नवऱ्याचं नाव असून लग्नानंतर ती देश सोडून लंडनला शिफ्ट झाली. 1990मध्ये तिनं लग्न केलं. लग्नानंतर तिला रेयान हार्डी ही मुलगी झाली.
मुलीच्या जन्मानंतर राधिकाच्या वैवाहिक आयुष्यात अनेक वादळं आली. राधिकाचा दुसरा पती तिला त्रास देऊ लागला. रिचर्डने राधिकाला शिवीगाळ करण्याबरोबरच तिचा छळ करण्यास सुरुवात केली, त्यामुळे राधिकाने रिचर्डपासून वेगळा होण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या मुलीसह पुन्हा भारतात परतली. हार्डीसोबत घटस्फोट झाल्यानंतर तिनं २००१ मध्ये साऊथ अभिनेता आणि राजकीय नेता आर सरथकुमारबरोबर लग्न केलं. सरथकुमारचं देखील पहिलं लग्न झालं होतं. त्याला दोन मुलं होती. तरीही त्यानं घटस्फोटित राधिकाबरोबर लग्न करण्याचा निर्णय घेतला. आज आर सरथकुमारबरोबर राधिका तिचं आनंदी आयुष्य जगतेय.