इतक्या कोटींचे आहेत मालक नसीरूद्दीन शाह,  20 व्या वर्षी  केले होते स्वत:पेक्षा 15 वर्षांनी मोठ्या मुलीसोबत लग्न  

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2020 04:01 PM2020-07-20T16:01:56+5:302020-07-20T16:10:53+5:30

आज नसीर यांचा वाढदिवस.

naseeruddin shah birthday special his property and personal life facts | इतक्या कोटींचे आहेत मालक नसीरूद्दीन शाह,  20 व्या वर्षी  केले होते स्वत:पेक्षा 15 वर्षांनी मोठ्या मुलीसोबत लग्न  

इतक्या कोटींचे आहेत मालक नसीरूद्दीन शाह,  20 व्या वर्षी  केले होते स्वत:पेक्षा 15 वर्षांनी मोठ्या मुलीसोबत लग्न  

googlenewsNext
ठळक मुद्देनसीर यांनी मनारा पासून विभक्त झाल्यानंतर नॅशनल स्कूल आॅफ ड्रामामधून अ‍ॅक्टिंगचा कोर्स केला होता. येथूनच त्यांच्या आयुष्याला ख-या अर्थाने कलाटणी मिळाली.

बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्यांमध्ये मोडणारे एक नाव म्हणजे नसीरुद्दीन शाह. आपला स्पष्टवक्तेपणा आणि परखड व्यक्तिमत्वासाठी नसीर ओळखले जातात.   1980मध्ये आलेल्या ‘हम पांच’ या चित्रपटातून त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर  मंथन, मिर्चमसाला , भवनी भवाई , अलबर्ट पिन्टो को गुस्सा क्यों आता है, उमराव जान,  जाने भी दो यारों यांसारख्या चित्रपटांच्या माध्यामांतून त्यांनी प्रेक्षकांच्या मनात आपल अढळ स्थान निर्माण केले. आज नसीर यांचा वाढदिवस. आज ते 70 वा वाढदिवस साजरा करत आहेत.

 नसीर यांच्या करिअरबद्दल अनेकांना ठाऊक आहेच, पण आज आम्ही त्यांच्या संपत्तीबद्दल सांगणार आहोत. ऐकून आश्चर्य वाटेल पण नसीर यांच्याकडे एकूण 378 कोटींची संपत्ती आहे. ‘रिपब्लिक’ ने दिलेल्या वृत्तानुसार, नाटक, चित्रपट आणि जाहिरातींच्या माध्यमातून त्यांनी ही संपत्ती मिळवली आहे.

 नसीर यांचा जन्म 20 जुलै 1949मध्ये उत्तरप्रदेशातील बाराबंकीमध्ये झाला. त्यांचे वडिल एक आर्मी आॅफिसर होते, तर आई गृहीणी होती.  

वयाच्या अवघ्या 20व्या वर्षी नसीरुद्दीन शाह यांनी आपल्या वयापेक्षा 15वर्षांनी मोठ्या असलेल्या मनारा सीकरीसोबत लग्न केले होते. त्यांच्या पत्नी मनारा यांना परवीना मुराद या नावानेही ओळखले जाते. नसीर यांनी मनारासोबत लग्न करण्याची इच्छा घरातल्यांना सांगितली होती त्यावेळी त्यांच्या घरातल्यांनी त्यांच्या लग्नाला विरोध केला होता.

घरातल्यांचा विरोध असतानाही नसीर यांनी मनारासोबत लग्न केले. लग्नानंतर वर्षभरातच मनारा यांनी एका मुलीला जन्म दिला. तिचे नाव नसीर यांनी हीबा शाह असे ठेवले त्यानंतर वर्षभरातच नसीर आणि मनारा यांच्यात खटके उडायला लागले. 1982मध्ये नसीर आणि मनारा यांच्यात घटस्फोट झाला. 

काही दिवसांनी मनारा आपल्या मुलीला घेऊन ईराणमध्ये निघून गेली. जेव्हा हीबा मोठी झाली त्यावेळी ती आपल्या आईला सोडून वडीलांकडे म्हणजे नसीर यांच्यासोबत राहू लागली. पुढे जाऊन हीबाने लग्न न करण्याचा निर्णय घेतला. सध्या ती आपले वडिल, सावत्र आई आणि सावत्र भावंडांसह राहते. 

नसीर यांनी मनारा पासून विभक्त झाल्यानंतर नॅशनल स्कूल आॅफ ड्रामामधून अ‍ॅक्टिंगचा कोर्स केला होता. येथूनच त्यांच्या आयुष्याला ख-या अर्थाने कलाटणी मिळाली. 1975मध्ये त्यांची भेट रत्ना पाठक यांच्यासोबत झाली. रत्ना त्यावेळी एक कॉलेज स्टुडंट होती. नसीर आणि रत्ना एका नाटकाच्या रिर्हसल दरम्यान भेटले होते. दोघांच्या भेटीगाठी वाढल्या, दोघांचे एकमेकांवर प्रेम जडले. 1982मध्ये या दोघांनी लग्न केले. नसीर आणि रत्ना यांना दोन मुले असून त्यांची नावे इमाद आणि विवान आहे.

Web Title: naseeruddin shah birthday special his property and personal life facts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.