Join us

नसीरुद्दीन शाह यांना मिळाला डिस्चार्ज, त्यांची अवस्था पाहून चाहते पडले चिंतेत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2021 7:21 PM

नसीरुद्दीन शाह यांना मागील आठवड्यात निमोनिया झाल्यामुळे रूग्णालयत दाखल करण्यात आले होते.

बॉलिवूड अभिनेते नसीरुद्दीन शाह यांना मागील आठवड्यात निमोनिया झाल्यामुळे रूग्णालयत दाखल करण्यात आले होते. बुधवारी सकाळी त्यांना रूग्णालयातून रजा देण्यात आली आहे. नसीरुद्दीन शाह घरी परतल्यानंतर मुलगा विवानने वडिलांचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यांचे रूग्णालयातून घरी आल्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहेत. विवानने पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये नसीरुद्दीन शाह यांची पत्नी रत्ना पाठक देखील दिसत आहे.

विवानने वडिलांचे फोटो इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये नसीरुद्दीन शाह यांनी नारंगी रंगाचा टी-शर्ट आणि पांढऱ्या रंगाची पँट घातलेली दिसते आहे. विवानने वडिलांच्या फोटोवर 'घर वापसी' असे लिहिले आहे.

नसीरुद्दीन शाह यांच्या प्रकृतीची माहिती देत विवान म्हणाला, 'आज सकाळी रूग्णालयातून डिस्चार्ज मिळाली आहे.' नसीरूद्दीन शाह यांना २९ जून रोजी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.

अभिनेते नसीरुद्दीन शाह यांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर ते गेल्या वर्षी रिलीज झालेल्या 'बंदिश बँडिट्स' या वेबसीरिजमध्ये दिसले होते. या सिरीजमध्ये ते राग दरबारीच्या भूमिकेत दिसले होते. ही सिरीज प्रेक्षकांना खूप आवडली होती.

टॅग्स :नसिरुद्दीन शाह