Join us

Naseeruddin Shah : 'अकबरने कधीच नवीन धर्म....', मुघलांच्या इतिहासावर पुन्हा शाह यांचं वक्तव्य चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2023 11:21 IST

नसीरुद्दीन शाह आगामी सिरीजमध्ये अकबराच्या भूमिकेत दिसणार आहेत. मुघलांचा इतिहास चुकीच्या पद्धतीने पसरवण्यात आला आहे असं ते म्हणाले.

Naseeruddin Shah : ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह 'ताज-डिवायडेड बाय ब्लड' (Taj-divided by blood)  या सिरीजमध्ये अकबराच्या भूमिकेत दिसणार आहेत. सिरीजच्या प्रमोशनदरम्यान नसीरुद्दीन शाह अनेक वादग्रस्त वक्तव्य करत आहेत. आता नुकतेच त्यांनी मुघलांच्या इतिहासावर काही विधानं केली आहेत जी चर्चेत आहेत. मुघलांचा इतिहास चुकीच्या पद्धतीने पसरवण्यात आला आहे. अकबरला कधीच नवीन धर्म सुरु करायचा नव्हता.

नुकत्याच एका मुलाखतीत नसीरुद्दीन शाह म्हणाले, 'अकबरचे जे फोटो काढले गेले ते नेहमीच परोपकारी, दयाळु, व्यापक आणि प्रगतीशील विचारांचे होते. त्याला एक नवीन धर्म सुरु करायचा होता असं म्हणलं जातं. हे साफ खोटं आहे. मी स्वत: अधिकृत इतिहासकारांशी बोललो आहे. अकबरने कधीही नवीन धर्म सुरु करण्याचा प्रयत्न केला नाही. हे एक असे तथ्य आहे जे इतिहासात 'दीन -ए -इलाही' म्हणून लिहिले गेले आहे. पण अकबरने कधीही दिन-ए इलाही हा शब्द वापरला नाही. त्याने त्याला वाहदत-ए इलाही म्हटलं, ज्याचा अर्थ सर्वांची निर्मिती करणारा एकच होता, असा होतो.'

Taj Divided by blood : नसीरुद्दीन शाह म्हणाले, 'बरं झालं तुझ्यासोबत रोमॅंटिक सीन नाही'; अभिनेत्रीने सांगितला किस्सा

ते पुढे म्हणाले, 'तुम्ही एका दगडाची पूजा करा, उगवणाऱ्या सूर्याला अभिवादन करा, हवं ते करु शकता पण या सगळ्यात तुम्ही एकाच गोष्टीची पूजा करत आहात. असा त्यांना विश्वास होता. मला हेच समजले आहे.'

मुघलांनी आपले काहीच वाकडे केले नाही 

Naseeruddin Shah : 'सिनेमात नेहमी मुसलमानाचाच मृत्यू...' नसीरुद्दीन शाह यांचे वक्तव्य चर्चेत; फिल्म इंडस्ट्रीवर साधला निशाणा

नसीरुद्दीन शाह म्हणाले, 'देशासोबत जे चुकीचे झाले ते मुघलांनीच केले असं लोकांना वाटतं. ही फार हास्यास्पद गोष्ट आहे. लोकं अकबर किंवा नादीर शाह किंवा बाबरचे आजोबा तैमूर यांसारख्या जीवघेण्या आक्रमणकारांमध्ये अंतर करु शकत नाही.हे खरं असू शकतं पण त्यांना खलनायक बनवण्याची गरज नाही. जर मुघल इतकेच वाईट होते तर त्यांनी बांधलेले सर्व स्मारक का पाडत नाही.'

'ताज : डिवायडेड बाय ब्लड' ही सिरीज ३ मार्च रोजी zee5 या ओटीटीवर प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहे. यामध्ये धर्मेंद्र, आदिती राव हैदरी, राहुल बोस यांचीही भूमिका आहे. 

टॅग्स :नसिरुद्दीन शाहइतिहाससोशल मीडियाट्रोल