Join us

नसिरुद्दीन शहाच्या मुलीवर दाखल करण्यात आला गुन्हा, हे आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2020 4:14 PM

नसिरुद्दीन शहा यांची मुलगी हिबा शहावर वर्सोवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ठळक मुद्देहिबाने एका प्राण्यांच्या क्लिनिकमधील दोन कर्मचाऱ्यांना मारहाण केली असल्याचा आरोप तिच्यावर लावण्यात आला आहे. ही घटना 16 जानेवारीला घडली असून तिच्यावर मुंबईतील वर्सोवा पोलिस स्थानकात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

नसिरुद्दीन शहा नुकतेच अनुपम खेर यांच्यावर करण्यात आलेल्या टिप्पणीमुळे चर्चेत आले होते. पण आता त्यांच्या मुलीच्या संदर्भातील एक बातमी आली आहे. नसिरुद्दीन शहा यांची मुलगी हिबा शहावर मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

हिबाने एका प्राण्यांच्या क्लिनिकमधील दोन कर्मचाऱ्यांना मारहाण केली असल्याचा आरोप तिच्यावर लावण्यात आला आहे. ही घटना 16 जानेवारीला घडली असून तिच्यावर मुंबईतील वर्सोवा पोलिस स्थानकात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिस सध्या या प्रकरणाची चौकशी करत आहेत. एनएनआईने ट्विटरवर या घटनेतील काही फोटो शेअर केले आहेत.

या क्लिनिकमधील मंडळींनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, हिबा तिच्या मैत्रिणीच्या दोन मांजरींची नसबंदी करण्यासाठी या क्लिनिकमध्ये घेऊन गेली होती. पण काही कारणास्तव ही नसबंदी होऊ शकत नाही असे तेथील कर्मचाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे तिने कर्मचाऱ्यांसोबत वाद घातला आणि त्यांना धमकावले. एवढेच नव्हे तेथील कर्मचाऱ्यांवर तिने हात देखील उचलला. 

पोलिसांनी हिबावर कलम 323, 504, 506 च्या अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. पण हिबाने तिच्यावर लावण्यात आलेले आरोप चुकीचे असल्याचे म्हटले आहे. तिने कोणालाही मारहाण केलेली नाही. उलट क्लिनिकच्या गेटकिपरने मला आत जाण्यास मनाई केली आणि मला धक्काबुक्की केली असे हिबाने म्हटले आहे. 

टॅग्स :नसिरुद्दीन शाह