Join us

नसीरूद्दीन शाह यांनी वर्तवली चिंता; पुढील ५० वर्षांत चित्रपटगृहे इतिहासजमा होतील!!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2018 8:11 AM

बॉलिवूड अभिनेते यांनी भारतातील चित्रपटगृहांबद्दल एक चिंताजनक निरीक्षण नोंदवले आहे. होय, पुढील ५०वर्षांत देशातील चित्रपटगृहे हद्दपार होती. चित्रपटगृहांचे अख्खे ...

बॉलिवूड अभिनेते यांनी भारतातील चित्रपटगृहांबद्दल एक चिंताजनक निरीक्षण नोंदवले आहे. होय, पुढील ५०वर्षांत देशातील चित्रपटगृहे हद्दपार होती. चित्रपटगृहांचे अख्खे चित्र पालटेल, असे त्यांनी म्हटले आहे.  येत्या ५० वर्षांत लोक संगणक आणि इंटरनेटच्या आहारी जातील आणि परिणामी चित्रपटगृहे केवळ संग्रहालय म्हणून मागे उरतील. आम्ही या पडद्यावर चित्रपट बघायचो, येथे पॉपकॉर्न खायचो, असे सांगून लोक या संग्रहालयांना भेटी देतील. ५० वर्षांनंतर जन्मलेल्या लोकांना तर हजारो लोक एकत्र येऊन सिनेमे पाहायचे, याचेच अप्रूप वाटेल, असे नसीरूद्दीन म्हणाले.पुढील शंभर वर्षांत जी मुले जन्मतील त्यांच्या डोक्यावर टेलिफोन असेल, असे ते म्हणाले. अर्थात हे ते गमतीत म्हणाले. पण चित्रपटगृहांबद्दल मात्र नसीरूद्दीन जे बोलले, त्याने अनेकांना विचार करायला भाग पाडले. सध्या नसीरूद्दीन जेईई5वरचा डिजिटल्र शो ‘झीरो केएमएस’मध्ये बिझी आहेत. अलीकडे त्यांचा ‘अय्यारी’ चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा व मनोज वाजपेयी मुख्य भूमिकेत होते. थिएटरपासून सुरुवात करणा-या नसीर यांनी ‘निशांत’ या चित्रपटाद्वारे  आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. या आर्ट फिल्ममध्ये स्मिता पाटील आणि शबाना आझमी यांच्या मुख्य भूमिका होत्या. समांतर आणि व्यावसायिक अशा दोन्ही चित्रपटांमध्ये नसीर यांनी आपला ठसा उमटवला.ALSO READ : शबाना आझमींनी नसीरूद्दीन शाह यांना म्हटले होते, ‘अशा चेहऱ्याचे लोक हिरो होण्याची हिम्मत तरी कशी करतात?’ ‘मिर्झा गालिब’ या दूरदर्शनवरील मालिकेने नसीर यांचे एक अधुरे स्वप्न पूर्ण केले. या मालिकेत नसीर यांनी मिर्झा गालिब यांची भूमिका अशी काही जिवंत केली की,  ती प्रेक्षकांच्या मनात कायमची कोरली गेली. मिर्झा गालिबप्रमाणचे महात्मा गांधी यांची भूमिका साकारण्याच्या सुंदर स्वप्नाने त्यांना पछाडले होते. रिचर्ड एटिनबरो ‘गांधी’ चित्रपट बनवत होते. या चित्रपटासाठी नसीर यांनी आॅडिशनही दिले होते. मात्र नसीरऐवजी गांधींची भूमिका बेन किंग्सले यांना मिळाली. गांधी साकारण्याचे नसीर यांचे स्वप्न यामुळे भंगले. पण नसीर यांनी या स्वप्नाचा पिच्छा सोडला नाही. १९८२ मध्ये ‘गांधी’ रिलीज झाला. यानंतर १८ वर्षांनंतर कमल हासन यांनी ‘हे राम’ हा चित्रपट बनवला. या चित्रपटाने नसीर यांचे स्वप्न पूर्ण झाले. यात त्यांना गांधी साकारण्याची संधी मिळाली. या भूमिकेत नसीर यांनी इतका जीव ओतला की, त्यांच्या इतका मुरब्बी अभिनेता बॉलिवूडमध्ये दुसरा कुणीही नाही, हेच जणू त्यांनी सिद्ध केले.