Hardik Pandya - Natasa Stankovic : भारतीय क्रिकेट संघाचा दमदार क्रिकेटपटू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि नताशा (Natasa Stankovic) यांची गेल्या काही दिवसांपासून कायम चर्चेत आहेत. हार्दिक आणि नताशाच्या घटस्फोटाचे कारण काय होते? हे प्रत्येकाला जाणून घ्यायचे आहे. अशातच आता नताशाच्या एका पोस्टवरुन हार्दिकची चूक होती का? अशी शंका देखील नेटकरी उपस्थित करतायेत.
नताशा सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. हार्दिकपासून घटस्फोट घेतल्यानंतर नताशाच्या प्रत्येक पोस्टकडे चाहत्यांचं लक्ष असतं. घटस्फोटाचे कारण नताशाने स्पष्ट सांगितले नसले तरी तिच्या पोस्ट बरचं काही बोलून जातात. आता देखील नताशा हिने सोशल मीडियावर एक क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे. इन्स्टाग्रामवर पोस्ट करत नताशा हिने आयुष्यात प्रामाणिकपणा किती महत्त्व आहे, हे सांगितलं आहे. नताशाने लिहलं, "तुमच्या पाठीमागे असलेला प्रामाणिकपणा हा खरोखरच सर्वोच्च उत्तम दर्जाचा असतो". नताशाची ही पोस्ट चर्चेचा विषय बनली आहे. हार्दिक हा तिच्याशी प्रामाणिक नव्हता, असं म्हटलं जातंय. आता या चर्चा सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतायेत.
हार्दिक आणि नताशा लग्नानंतर ४ वर्षांनी वेगळे झाले आहेत. बरेच प्रयत्न करुनही ते नातं टिकवू शकले नाहीत. आयपीएलपासूनच दोघांमध्ये बिनसल्याचं समोर आलं होतं. वर्ल्ड कप जिंकल्यानंतरही नताशान हार्दिकसाठी एकही पोस्ट केली नव्हती. यानंतर तिने आयुष्यासंदर्भात अनेक क्रिप्टिक पोस्ट शेअर केल्या होत्या. त्यानंतर त्यांनी घटस्फोट जाहीर केला होता. हार्दिकने 2020 मध्ये दुबईमध्ये नताशाला प्रपोज केलं होतं आणि 31 मे 2020 रोजी लॉकडाऊन दरम्यान दोघांनी लग्नगाठ बांधली होती. 30 जुलै 2020 रोजी नताशा आणि हार्दिकच्या आयुष्यात मुलगा अगस्त्या याचं आगमन झालं होतं.