Join us

हार्दिकशी घटस्फोटानंतर नताशाने माहेरी साजरा केला लेकाचा वाढदिवस, म्हणाली, "तुला कधीच..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2024 12:21 IST

नताशाने अगस्त्यसोबत फोटो शेअर करत लिहिले...

भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्याशी (Hardik Pandya) घटस्फोट जाहीर केल्यानंतर नताशा (Natasa Stankovic) तिच्या सर्बिया येथील घरी गेली. सोबत तिने अगस्त्य या आपल्या लेकालाही नेलं. काल छोट्या अगस्त्यचा वाढदिवस होता. हार्दिक पांड्यानेसोशल मीडियावर भावूक व्हिडिओ शेअर करत त्याला शुभेच्छा दिल्या. तर दुसरीकडे नताशाने एकटीनेच माहेरी लेकाचा वाढदिवस साजरा केला. तिचीही पोस्ट आता व्हायरल होत आहे.

नताशाने अगस्त्यसोबत फोटो शेअर करत लिहिले, "माझा बुबा, तू माझ्या आयुष्यात शांतता, प्रेम आणि आनंद घेऊन आलास. माझा सुंदर मुलगा, तू मला मिळालेला आशीर्वाद आहेस. तू खूप गोड आणि प्रेमळ आहेस. नेहमी असाच राहा. तुझं हे प्रेमळ मन मी या जगाला कधीच बदलू देणार नाही.  तुझा हात हातात धरुन मी नेहमी तुझ्या बाजूने उभी राहीन.  आय लव्ह यू.मम्मा."

दुसरीकडे हार्दिकनेही लेकासाठी सोशल मीडियावर भावना शेअर केल्या. 'आयुष्यात प्रत्येक दिवशी पुढे जाण्यासाठी तूच माझी प्रेरणा आहेस' असं त्याने लिहिलं होतं. हार्दिक आणि नताशा लग्नानंतर 4 वर्षांनी वेगळे झाले. तरी आजही दोघं एकमेकांना सोशल मीडियावर फॉलो करतात. काही दिवसांपूर्वी नताशाने लेकासोबत फोटो शेअर केले होते. यावर हार्दिकनेही कमेंट केली होती. 

टॅग्स :नताशा स्टँकोव्हिचहार्दिक पांड्यासोशल मीडियापरिवार