Join us

अरे देवा! हे काय झालं...Exercise करताना पडली पांड्याची Ex बायको, नताशाचा व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 14:01 IST

व्हिडिओत नताशा तिचा फिटनेस ट्रेनर अलेक्झांडरसोबत एक्सरसाईज करताना दिसत आहे. पण, एक्सरसाइज करतानाच नताशाचा तोल जाऊन ती खाली पडत असल्याचं दिसत आहे.

मॉडेल आणि अभिनेत्री नताशा स्टँकोविक पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नताशाचा चाहता वर्ग मोठा आहे. ती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. क्रिकेटर हार्दिक पांड्यापासून घटस्फोट घेतल्यानंतर नताशा तिच्या मूळ देशात गेली होती. त्यानंतर पुन्हा भारतात परतत तिने कामाला सुरुवात केली आहे. नताशा तिच्या फिटनेसकडेही विशेष लक्ष देताना दिसते. 

डाएट फॉलो करण्याबरोबरच नताशा नियमित व्यायामही करते. याचे व्हिडिओही ती शेअर करत असते. नताशाचा असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत नताशा तिचा फिटनेस ट्रेनर अलेक्झांडरसोबत एक्सरसाईज करताना दिसत आहे. पण, एक्सरसाइज करतानाच नताशाचा तोल जाऊन ती खाली पडत असल्याचं दिसत आहे. नताशाच्या ट्रेनरने तिच्या वाढदिवशी हा व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत. 

नताशा आणि हार्दिकने २०२० मध्ये लॉकडाऊनमध्येच लग्न केलं होतं. लग्नाआधीच नताशा प्रेग्नंट होती. लग्नानंतर काही महिन्यांतच नताशाने अगस्त्य या त्यांच्या मुलाला जन्म दिला. पण, चार वर्षांतच त्यांच्या खटके उडू लागल्याने नताशा आणि हार्दिक घटस्फोट घेत एकमेकांपासून वेगळे झाले. 

टॅग्स :नताशा स्टँकोव्हिचहार्दिक पांड्या