Join us

हार्दिक पांड्यासोबतच्या घटस्फोटानंतर पहिल्यांदाच बोलली नताशा, म्हणाली- "आम्ही अजूनही..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2024 16:01 IST

लग्नानंतर ४ वर्षांनी नताशा आणि हार्दिक घटस्फोट घेत एकमेकांपासून वेगळे झाले. आता घटस्फोटानंतर इतक्या महिन्यांनी पहिल्यांदाच नताशाने भाष्य केलं आहे. 

बॉलिवूड अभिनेत्री नताशा स्टँकोविच आणि क्रिकेटर हार्दिक पांड्या घटस्फोट घेत एकमेकांपासून वेगळे झाले आहेत. नताशा आणि हार्दिकने जुलै महिन्यात घटस्फोट घेत असल्याचं सोशल मीडियावरुन जाहीर केलं. लग्नानंतर ४ वर्षांनी नताशा आणि हार्दिक घटस्फोट घेत एकमेकांपासून वेगळे झाले. आता घटस्फोटानंतर इतक्या महिन्यांनी पहिल्यांदाच नताशाने भाष्य केलं आहे. 

नताशाने नुकतीच ईटाइम्सला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने घटस्फोट आणि हार्दिकबद्दल भाष्य केलं. नताशा म्हणाली, "मी पुन्हा माझ्या देशात परतत असल्याच्या चर्चा सुरू होत्या. पण, मी परत कशी जाऊ शकते? मला एक मुलगा आहे. तो इथेच शाळेत जातो. त्यामुळे मी परत जाण्याचा प्रश्नच येत नाही. मी आणि हार्दिक अजूनही एक कुटुंब आहोत. आम्हाला एक मुलगा आहे. आणि शेवटी तो आम्हाला कुटुंब बनवतोच. अगस्त्यला त्याच्या दोन्ही पालकांची गरज आहे. गेली दहा वर्ष मी त्याच वेळेला दरवर्षी सर्बियाला जाते".

नताशा आणि हार्दिकने २०२० मध्ये लॉकडाऊन सुरू असताना लग्न केलं होतं. हार्दिकशी लग्न केलं तेव्हा नताशा गरोदर होती. लग्नानंतर काही महिन्यांनी नताशाने त्यांच्या पहिल्या बाळाला जन्म दिला. अगस्त्य असं हार्दिक-नताशाच्या लेकाचं नाव असून तो आता चार वर्षांचा आहे. दरम्यान, हार्दिकशी लग्न केल्यानंतर नताशा इंटस्ट्रीपासून दूर गेली होती. पण,  घटस्फोटानंतर नताशाने पुन्हा इंडस्ट्रीत कमबॅक केलं आहे. अलिकडेच तिचं तेरे करके हे गाणं प्रदर्शित झालं आहे. बादशहाच्या डीजे वाले बाबू गाण्यातून नताशा प्रसिद्धीझोतात आली होती. 

टॅग्स :नताशा स्टँकोव्हिचहार्दिक पांड्यासेलिब्रिटी