Join us  

हार्दिकच्या ब्रिटिश गायिकेशी अफेअरच्या चर्चा; तिकडे नताशा म्हणाली, "योग्य वेळ आली की..."

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2024 11:28 AM

नेटकरी आता मागताएत नताशाची माफी

भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या (Hardik Pandya)  आणि नताशा स्टॅन्कोव्हिक (Natasa Stankovic) यांचा काही दिवसांपूर्वीच घटस्फोट झाला. यानंतर सध्या हार्दिक एका ब्रिटीश गायिकेला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. जास्मिन वालिया या मूळ भारतीय असलेली ब्रिटीश गायिकेसोबत हार्दिक ग्रीस येथे व्हॅकेशन एन्जॉय  करत असल्याचा संशय  चाहत्यांना आला. या चर्चांदरम्यान हार्दिकची एक्स वाईफ नताशाने शेअर केलेली पोस्ट चर्चेत आहे.

घटस्फोट जाहीर करण्याच्या आधीपासूनच नताशा अनेकदा सोशल मीडियावर काही क्रिप्टिक पोस्ट शेअर करायची. आता एकीकडे हार्दिकच्या अफेअरची चर्चा आहे दुसरीकडे नताशाने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर केली आहे. ती म्हणते, 'जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा देव सगळं नीट करेल. तुम्ही घाई करणं बंद करा. जेव्हा आपण घाई करत नाही तेव्हाच आपण देवाला त्याचं काम करण्यासाठी वेळ देतो. आपण स्लो होतो तेव्हा देवाला आपण स्पेस देतो. तेव्हाच तो फास्ट होतो.' यासोबत नताशाने कॅप्शनमध्ये लिहिले, 'आपल्याकडे वेळ नाही हा विचार करुन आपण सगळ्याच गोष्टीत घाई करतो. गोष्टी आपल्या हातातून निघून जातात पण घाई केल्याने आपण एक गोष्ट गमावून बसतो ती म्हणजे देवाचा आशीर्वाद. देव कधीच उशीर करत नाही."

नताशाच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी यावेळी वेगळ्या कमेंट केल्या आहेत. आतापर्यंत नताशाला तिनेच हार्दिकला धोका दिला म्हणत ट्रोल केलं जात होतं. मात्र आता नेटकरी कमेंट्समध्ये चक्क तिची माफी मागत आहेत.  हार्दिक आणि नताशाने फेब्रुवारी महिन्यात व्हॅलेंटाईन डे साजरा केला होता. यानंतर त्याच्यात काय बिनसलं हे कोणालाच कळलं नाही. नताशाने आयपीएल आणि वर्ल्ड कपदरम्यान एकही पोस्ट केली नाही. यामुळे त्यांच्यात बिनसल्याचं स्पष्ट झालं होतं. 18 जुलै रोजी दोघांनी ऑफिशियल पोस्ट करत घटस्फोट जाहीर केला.

टॅग्स :नताशा स्टँकोव्हिचहार्दिक पांड्यारिलेशनशिपघटस्फोट