Join us  

"तुम्हीच त्यांचं जग अन् प्रेम करण्यासाठी", हार्दिक पांड्यापासून विभक्त झाल्यानंतर नताशाने शेअर केली पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2024 10:18 AM

नताशाने एक पोस्ट शेअर केली असून सर्वांचं लक्ष वेधलं आहे. 

Hardik Pandya Natasa Stankovic Divorce : नताशा स्टँकोव्हिच (Natasha Stankovic) गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि नताशामध्ये आयपीएल 2024 पासून दुरावा आल्याचं बोललं जात होतं. अखेर अलिकडेच त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ते वेगळे झाल्याचे सांगितले. यातच आता नताशाने एक पोस्ट शेअर केली असून सर्वांचं लक्ष वेधलं आहे. 

नताशाने पालकत्वावर भाष्य केलं आहे. तिनं एक पोस्ट इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर शेअर केली आहे. तिनं पालकांना मुलांवर कठोर न होण्याचा आणि  भरभरुन प्रेम करण्याचा सल्ला दिलाय. पोस्टमध्ये लिहलेलं आहे की, 'आपल्या मुलांवर फार कठोर होऊ नका. कारण हे जग एक कठीण ठिकाण आहे. मजबूत प्रेम नाही, तर मजबूत नशीब आहे. वस्तुस्थिती ही आहे की जेव्हा ते तुमच्यासाठी जन्माला येतात, तेव्हा तुम्हीच त्यांचं जग असता आणि  प्रेम करण्यासाठी ते तुमचे असतात'. 

सध्या नताशा ही मुलगा अगस्त्यसह तिचं होमटाऊन सर्बियामध्ये आहे. अगस्त्यसोबत ती आनंदी असल्याचं फोटोमध्ये पाहायला मिळत आहे. ती विविध पोस्ट शेअर करत चाहत्यांना अपडेट देत आहे.  हार्दिक आणि नताशा विभक्त झाले असले तरी अगस्त्यचे पालकत्व दोघांकडेही आहे. सध्या नताशा ही सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे.

दरम्यान, हार्दिक आणि नताशाने सोशल मीडिया पोस्ट करत घटस्फोट जाहीर केला होता. लग्नानंतर ४ वर्षांनी हार्दिक आणि नताशा वेगळे झाले. बरेच प्रयत्न करुनही ते नातं टिकवू शकले नाहीत. आयपीएलपासूनच दोघांमध्ये बिनसल्याचं समोर आलं होतं. वर्ल्ड कप जिंकल्यानंतरही नताशान हार्दिकसाठी एकही पोस्ट केली नव्हती. यानंतर तिने आयुष्यासंदर्भात अनेक क्रिप्टिक पोस्ट शेअर केल्या होत्या. 

टॅग्स :नताशा स्टँकोव्हिचहार्दिक पांड्यासेलिब्रिटीबॉलिवूडसोशल मीडिया