Join us

हार्दिक पांड्यासोबत विभक्त झाल्यानंतर जिममध्ये या व्यक्तीसोबत घाम गाळतेय नताशा, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 17:40 IST

Natasa Stankovic : हार्दिकसोबत घटस्फोट घेतल्यानंतर नताशाचे नाव जवळचा मित्र अलेक्झांडर ॲलेक्स इलिकशी जोडले जात आहे. आता नताशाचा वर्कआउटचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

मॉडेल नताशा स्टॅन्कोविक (Natasa Stankovic) आणि भारतीय क्रिकेटर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) यांचा घटस्फोट झाला आहे. २०२४ मध्ये या जोडप्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून विभक्त झाल्याची घोषणा केली होती. घटस्फोटानंतरही नताशा आणि हार्दिक चर्चेत येत असतात. दोघेही त्यांच्या आयुष्यात पुढे गेले आहेत आणि त्यांच्या कामावर लक्ष केंद्रित करत आहेत. हार्दिकसोबत घटस्फोट घेतल्यानंतर नताशाचे नाव जवळचा मित्र अलेक्झांडर ॲलेक्स इलिकशी जोडले जात आहे. आता नताशाचा वर्कआउटचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

नताशा आणि अलेक्झांडर अनेकदा एकत्र दिसतात. पार्टीपासून ते वर्कआऊटपर्यंत त्यांचे फोटो आणि व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत असतात. आता नताशा आणि अलेक्झांडरचे वर्कआउट व्हिडिओ व्हायरल होत आहेत. ज्यावर लोक खूप कमेंट करत आहेत. नताशा आणि अलेक्झांडरचा व्हिडीओ पाहून लोक तो तिचा बॉयफ्रेंड असल्याचे सांगत आहेत. त्याचबरोबर काही लोक या दोघांच्या फिटनेस रुटीनचे कौतुक करत आहेत. नताशाच्या लूकबद्दल बोलायचे झाले तर तिने काळ्या रंगाचा जिम आउटफिट परिधान केला आहे. अलेक्झांडर निळ्या रंगाच्या जिमवेअरमध्ये दिसत आहे. या व्हिडीओंना हजारो लोकांनी लाईक केले आहे.

कोण आहे अलेक्झांडर? ज्या व्यक्तीसोबत नताशाचे नाव जोडले जात आहे तो अलेक्झांडर फिटनेस कोच, मॉडेल आणि अभिनेता आहे. सिकंदरला दिशा पटानीसोबतही अनेकदा स्पॉट करण्यात आले आहे. दोघांचे एकत्र फोटो व्हायरल होत आहेत.

नताशा आणि हार्दिकबद्दल बोलायचे झाले तर, दोघांनी २०२० मध्ये लग्न केले. दोघांचे लग्न अगदी साधेपणाने झाले. त्यानंतर २०२२ मध्ये हार्दिक आणि नताशाचे डेस्टिनेशन वेडिंग झाले होते. ज्यामध्ये त्यांचा मुलगा अगस्त्यही सहभागी झाला होता. नताशा आणि हार्दिकच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

टॅग्स :नताशा स्टँकोव्हिचहार्दिक पांड्या