Join us
Daily Top 2Weekly Top 5

"एखादी व्यक्ती नेहमीपेक्षा वेगळी वागत असेल तर...", हार्दिक पांड्याची पत्नी नताशाला नेमकं काय म्हणायचंय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2024 10:52 IST

हार्दिक-नताशामध्ये बिनसल्याच्या आणि त्यांच्यात दुरावा आल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. अशातच नताशाने सोशल मीडियावरुन एक व्हिडिओ शेअर केला होता. यामुळे चाहते संभ्रमात होते. आता पुन्हा तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे.  

भारतीय क्रिकेटर हार्दिक पांड्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. हार्दिक आणि त्याची पत्नी नताशा स्टँकोविक यांच्यात बिनसल्याचं समजत आहे. त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चाही रंगल्या आहेत. नताशाने IPL किंवा वर्ल्डकपमध्ये पांड्यासाठी एकही पोस्ट केलेली नाही. स्टेडियममध्येही नताशा त्याला चिअर करताना दिसली नाही. त्यामुळेच हार्दिक-नताशामध्ये बिनसल्याच्या आणि त्यांच्यात दुरावा आल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. अशातच नताशाने सोशल मीडियावरुन एक व्हिडिओ शेअर केला होता. यामुळे चाहते संभ्रमात होते. आता पुन्हा तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे.  

या व्हिडिओत नताशा म्हणते, "कॉफी घेताना माझ्या मनात एक विचार आला. आपण किती पटकन एखाद्याबद्दल मत बनवतो. एखादी व्यक्ती नेहमीपेक्षा वेगळी वागत असेल तर आपण त्याचं निरिक्षण करत नाही. त्याच्याकडे शांतपणे पाहत नाही आणि सहानुभुतीही दाखवत नाही. आपल्याला त्याची बदललेली वागणूक पाहून मत बनवण्याची घाई असते. काय घडलंय हे आपल्याला माहीत नसतं. या परिस्थितीमागे नेमकी काय कारणं आहेत, तेदेखील माहीत नसतं. तर आपण एखाद्याबद्दल लगेच मत बनवण्याआधी त्याचं निरिक्षण करूया. थोडी सहानुभुती दाखवुया आणि संयम ठेवुया". नताशाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये हा व्हिडिओ शेअर केला होता. 

याआधीही नताशाने अशा अनेक क्रिप्टिक पोस्ट आणि व्हिडिओ शेअर केले आहेत.  "देव नेहमी तुमच्याबरोबर असेल, तो तुम्हाला कधीच सोडणार नाही, तुमची साथ सोडणार नाही. घाबरू नका आणि निराश होऊ नका", असं नताशा एका व्हिडिओत म्हणाली होती. नताशाच्या या व्हिडिओंमुळे हार्दिकबद्दलच्या तिच्या घटस्फोटाच्या चर्चा अधिकच रंगू लागल्या आहेत. 

हार्दिक आणि नताशाने ३१ मे २०२० रोजी लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली होती. लग्नानंतर काहीच महिन्यांत नताशाने अगस्त्य या त्यांच्या पहिल्या मुलाला जन्म दिला. अनेकदा नताशा हार्दिक आणि अगस्त्यबरोबरचे फोटो शेअर करताना दिसायची. IPL दरम्यान सहानुभुती मिळवण्यासाठी हार्दिक-नताशाने घटस्फोटाचा स्टंट केल्याचं म्हटलं जात होतं. पण, वर्ल्डकपमध्येही नताशा कुठेच न दिसल्याने पुन्हा त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगल्या आहेत. याबाबत अद्याप हार्दिक किंवा नताशाने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.  

टॅग्स :नताशा स्टँकोव्हिचहार्दिक पांड्याऑफ द फिल्ड