नुकतेच नताशाने इंस्टाग्राम स्टोरीवर नवरा हार्दिक पांड्या आणि मुलगा अगस्त्यचा क्यूट व्हिडीओ शेअर केला आहे.या व्हिडीओत हार्दिक त्याचा मुलगा अगस्त्यला बाहेर फिरवताना दिसतो आहे.१ जानेवारी २०२० रोजी हार्दिक आणि नताशा यांनी वर्षाच्या सुरुवातीला दुबईत मोजक्याच मित्रांच्या साक्षीनं साखरपुडा केला. हार्दिकनं ही बातमी सोशल मीडियावरून सर्वांना सांगितली.हार्दिकच्या या सरप्राईजबद्दल त्याच्या कुटुंबीयांनाही माहित नव्हते. त्यानंतर लॉकडाऊन सुरु झाले आणि नताशा ही हार्दिकच्या घरीच राहत होती. नताशा आणि हार्दिक यांचे लग्न झाल्याचे फोटो चाहत्यांनी व्हायरल केले होते.
कोरोनाच्या संकटामुळे देश लॉकडाऊनमध्ये असताना हार्दिक आणि नताशाने देशवासियांना आपल्या पहिल्या मुलाच्या आगमनाची बातमी दिली होती. नताशा नेहमीच आपल्या ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत असायची. सध्या ती तिचे मदरहुड एन्जॉय करत आहे. हार्दीकसह रिलेशनशीपमध्ये असण्यापूर्वी नताशा टीव्ही अभिनेता अली गोनीसह रिलेशनशिपमध्ये होती.
काही कारणामुळे यांच्यात दुरावा निर्माण झाला आणि दोघांचे मार्ग वेगवेगळे झाले. विशेष म्हणजे अली नताशाचा एक्स बॉयफ्रेंड असूनही हार्दीकसह नताशाचे अफेअर आहे याबद्दल काहीच माहीती नव्हेत. जेव्हा दोघांच्या साखरपुड्याची बातमी वाचली तेव्हा त्यालाही मोठा आश्चर्याचा धक्काच बसला होता.
सर्बियन नागरिक असलेल्या नताशाने 'सत्याग्रह'सह अन्य काही बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच बिग बॉस-8 या कार्यक्रमातही तिने सहभाग घेतला होता. 'नच बलिये' या कार्यक्रमात ती एक्स बॉयफ्रेंड गोनीसोबत सहभाग घेतला होता. हार्दिकच्या गोड बातमीनंतर गोनीनं लिहिलं की,''अरे आई बनलीस.'' नताशानं त्याची ही कमेंट तिच्या इस्टाग्राम स्टोरीवर शेअर केली होती.
अली सध्या 'बिग बॉस १४' मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाला आहे. घरात त्याची खास मैत्रिण जास्मिनच्या प्रेमात असून तिच्यासह लग्न करण्याची इच्छा असल्याचे त्याने बोलून दाखवली होती.घरातही दोघांच्याच लव्हस्टोरीवर चर्चा रंगते. घरातून बाहेर आल्यानंतर जास्मिन भसीन आणि अली या दोघांचे नाते कितपत यशस्वी होते हे पाहणेही रंजक असणार आहे.