Join us

नऊवारी साडी, नथ आणि स्निकर्स, ‘केरला स्टोरी’ फेम अदा शर्माचा अनोखा स्वॅग

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2023 15:36 IST

अदा शर्माचा नऊवारी साडीतील मराठमोळा लूक सध्या चांगलाच चर्चेत आला आहे.

अभिनेत्री अदा शर्मा सध्या तिच्या 'द केरळ स्टोरी' या चित्रपटामुळे चर्चेत आहे.  या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचं कौतुकही होत आहे. यातच आता अदा शर्माचा नऊवारी साडीतील मराठमोळा लूक सध्या चांगलाच चर्चेत आला आहे.

अभिनेत्रीचं मराठी भाषेबद्दलचे प्रेम तर सर्वश्रुत आहे. तिला मराठी गाणी आणि कविता तोंडपाठ आहेत. अनेकदा चाहत्यांसोबत अस्खलित मराठी भाषेत बोलत असतानाचा व्हिडीओ शेअर करत असते.  नुकताचं तिने दहीहंडी उत्सवात सहभागी झाली होती. यावेळी तिने नाकात नथ, टिकली आणि पारंपारिक नऊवारी साडी आणि  नऊवारीसाडीवर स्निकर्स असा लूक केला होता. ही तिच्या आजीची साडी असल्याचे तिने सांगितले.

अभिनेत्रीच्या या लुकवर नेटकऱ्यांनी अनेक भन्नाट कमेंटस केल्या आहेत. एका नेटकऱ्याने म्हटलं की, या कपड्यांमध्ये तू खूप छान दिसत आहेस. तर एकाने बस्स अशाच मुलीची आयुष्यात कमी आहे, असे म्हटलं. तर  भारतीय संस्कृती या चित्रात दिसून येते, असे एका युजरने म्हटले. 

अदा शर्माने २००८ साली विक्रम भट्ट यांच्या '१९२०' या सिनेमातून तिने कलाविश्वात पदार्पण केलं. अदाने हिंदीसह तेलुगू आणि तामिळ सिनेमांमध्येही काम केलं आहे. त्यामुळे साऊथमध्येही तिची क्रेझ आहे.  अदाने केवळ १२ वी पर्यंत तिचं शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यानंतर ती अभिनय क्षेत्रात आली. अदा १० वीत असतानाच तिने अभिनेत्री होण्याचं ठरवलं होतं. त्यानुसार, तिने या क्षेत्रात पदार्पणही केलं.  

टॅग्स :अदा शर्माबॉलिवूड