नवराई लाडाची लाडाची गं... नेहाने घातला लाखमोलाचा लेंहगा भारी गं...!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2018 8:59 AM
बॉलिवूडची मस्सकली अभिनेत्री सोनम कपूर पाठोपाठ अभिनेत्री नेहा धूपियासुद्धा रेशीमगाठीत अडकली.बॉयफ्रेंड अंगद बेदीसह पंजाबी पद्धतीने तिचं शुभमंगल पार पडलं. ...
बॉलिवूडची मस्सकली अभिनेत्री सोनम कपूर पाठोपाठ अभिनेत्री नेहा धूपियासुद्धा रेशीमगाठीत अडकली.बॉयफ्रेंड अंगद बेदीसह पंजाबी पद्धतीने तिचं शुभमंगल पार पडलं. सोनमच्या लग्नात तिच्या लाखमोलाच्या लेंहग्याने साऱ्यांच्या नजरा आकर्षित केल्या होत्या.अगदी त्याचप्रमाणे नेहाने लग्नात परिधान केलेला लेंहगा लक्षवेधी ठरला.नेहाने तिच्या लग्नात गुलाबी रंगाचा आकर्षक असा लेंहगा परिधान केला होता.नेहाचा हा आकर्षक आणि सुंदर लेंहगा डिझायनर अनिता डोंगरे यांच्या कलेक्शनमधील होता.ब्लश गुलाबी रंगातील या लेंहग्यात नेहाचं सौंदर्य आणखीन खुलून गेलं होतं.यावेळी अनिता यांनी डिझाईन केलेली ज्वेलरी नेहाने परिधान केली होती.लेंहग्यावर चंदेरी एम्र्बॉयडरी करण्यात आली होती.दुपट्टा आणि चंदेरी ब्लाऊजसह त्याची मॅचिंग करण्यात आली होती.समर वेडिंगला लक्षात घेऊन नेहाचा हा आकर्षक असा लेंहगा डिझाईन करण्यात आला होता.लेंहग्यावरील गोटापट्टी वर्क, दरदोजी, रेशम, डोरी आणि सिक्वन वर्क त्याला आणखी आकर्षक बनवत होती.या लेंहग्याची किंमत जवळपास २ लाख रुपये इतकी असल्याचे सांगण्यात येत आहे.Also Read:सोनम कपूरच्या 'या' लेहंग्याची किंमत ऐकून तुम्हीसुद्धा आश्चर्यचकीत व्हाल!लग्नाच्या दिवशी दोघे दिल्ली एअरपोर्टवर स्पॉट झाले.याचाच अर्थ नेहा आणि अंगद यांनी हनीमूनसाठी टेक ऑफ घेतला आहे.मिळालेल्या माहितीनुसार नेहा आणि अंगद अमेरिकेत जाऊन काही दिवस राहणार आहेत.तिकडचे दोघे वेगवेगळ्या शहरात आपला हनीमून सेलिब्रेट करणार आहेत. अंगद हा पेक्षा अंगद दोन वर्षांनी लहान आहे. अंगद हा पूर्व क्रिकेटर बिशन सिंह बेदी यांचा मुलगा आहे.अंगद दिल्लीच्या 19 वर्षीय संघातून क्रिकेट खेळला आहे.नेहाच्या आधी अंगदचे नाव 'बिग बॉस' स्पर्धक असलेल्या नोरा फतेसोबत जोडण्यात आले होते.नोराशी ब्रेकअप झाल्यानंतर अंगद आणि नेहामध्ये जवळीकता वाढल्याचे कळतेय. या मैत्रिचे रुपातंर मग प्रेमात झाले. गेल्या एक वर्षांपासून दोघे एकमेकांना डेट करत होते.नेहाने बॉलिवूडशिवाय तेलुगू आणि मल्याळम चित्रपटात देखील काम केले आहे. तिने आपल्या करिअरची सुरुवात रंगमंचावरुन केली आहे तसेच Euphoriaच्या म्युझिक व्हिडिओमध्ये सुद्धा ती झळकली होती. सन १९९४ मध्ये ‘मिन्नरम’ या मल्याळम चित्रपटाद्वारे नेहाने आपल्या अभिनयाची सुरूवात केली होती.तर बॉलिवूडमध्ये तिने अजय देवगणच्या अपोझिट कयामत या चित्रपटातून पाऊल ठेवले. यानंतर २००२ मध्ये तिने फेमिना मिस इंडियाचा किताब जिंकला आहे.