Join us

नवरोबाचा शोध संपता संपेना...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2016 11:09 AM

अभिनेत्री प्रीती झिंटा अन् ऊर्मिला मातोंडकर यांच्या सिक्रेट लग्नाच्या बातम्या वाºयासारख्या पसरल्या. मात्र यात चर्चा झाली ती नवरी आणि ...

अभिनेत्री प्रीती झिंटा अन् ऊर्मिला मातोंडकर यांच्या सिक्रेट लग्नाच्या बातम्या वाºयासारख्या पसरल्या. मात्र यात चर्चा झाली ती नवरी आणि नवरदेवाच्या वयाची. ४२ वर्ष वय असलेल्या ऊर्मिलाचा पती काश्मिरी बिझनेसमन आणि मॉडेल मोहसिन अख्तर मीर हा तिच्यापेक्षा नऊ वर्षांनी लहान आहे, तर ४१ वर्षांच्या प्रीतीचा पती जीन गुडइनफ हा तिच्यापेक्षा दहा वर्षांनी लहान आहे. चाळिशी ओलांडलेल्या या दोन्ही अभिनेत्रींना त्यांच्या आयुष्याचा जोडीदार अखेर गवसला. मात्र बी टाऊनमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी वयाची पस्तीशी, चाळिशी ओलांडूनदेखील अद्याप लग्नाचा निर्णय घेतलेला नाही.सुष्मिता सेनसुष्मिता सेन भारताकडून मिस युनिव्हर्सचा किताब जिंकणारी पहिली मॉडेल आहे. तिने ‘बीवी नं. १, क्योकी मै झूठ नही बोलता, आंखे आणि दुल्हा मिल गया’सारख्या दमदार सिनेमामध्ये मुख्य भूमिका साकारत संसाराची स्वप्ने रंगविली. परंतु खºया आयुष्यात तिला अद्याप तिचा आयुष्याचा जोडीदार गवसला नाही. ४० वर्षांची झालेली सुष्मिता, माजी पाकिस्तानी क्रि केटर वसीम अकरम आणि उद्योगपती अनिल अंबानीसारख्या दिग्गजांसोबतच्या अफेअरमुळे चर्चत राहिली आहे.तब्बूइंडस्ट्रीतील अविवाहित अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे तबस्सूम हाश्मी ऊर्फ तब्बू हिने वयाची ४४ वर्ष पूर्ण केली. एकेकाळी नागार्जुनसोबतच्या अफेअरमुळे तब्बूचे नाव चर्चेत होते. मात्र अद्याप तिच्या लग्नाची बातमी आलेली नाही. काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत तब्बूने सांगितले होते, की जेव्हा तिला तिचा मिस्टर परफेशिनिस्ट मिळेल, तेव्हाच ती लग्न करेल. केवळ समाजाची परंपरा म्हणून लग्न करणार नाही.अमिषा पटेल३९ वर्षीय अमिषाने २००० साली ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एंट्री केली. पहिल्याच चित्रपटात ती प्रेक्षकांच्या मनात बसली. त्यानंतर ‘गदर आणि रेस-२’ यासारखे यशस्वी चित्रपटही केले. मात्र त्यानंतर ती फारशी चित्रपटात झळकली नाही. तिने संसार थाटला की काय असे प्रश्नही उपस्थित केले जाऊ लागले. निर्माता विक्र म भट्टसोबत तिच्या अफेअरच्या चर्चेमुळे लग्नाच्या वृत्ताला बळकटीच मिळाली. मात्र पुढे बिझनेस पार्टनर कुणाल गूमरसोबत ती डेटींग करीत असल्याचे समोर आल्याने अमिषाचे नक्की काय सुरू आहे, हा प्रश्न अजूनही अनुत्तरीतच आहे. नर्गिस फाखरीरॉकस्टार या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणारी अभिनेत्री नर्गिस फाखरी अभिनेता उदय चोप्रासोबत सिरिअस रिलेशनशिपमध्ये होती. मात्र आता दोघांचे मार्ग वेगळे झाल्याचे म्हटले जात आहे. वयाची ३६ वर्षे पूर्ण करणारी नर्गिस सध्या सिंगल असून, तिच्या लग्नाबाबतही बरीचशी चर्चा आहे.बिपाशा बसूबंगाली गर्ल बिपाशा बासू आणि जॉन अब्राहम यांचे अफेअर माध्यमांमध्ये बरेच गाजले होते. त्यानंतर यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आणि दोघाचे अफेअर तुटले. आता ती अभिनेता करण सिंगसोबतच्या अफेरअने चर्चेत आहे. ३७ वर्षांची झालेल्या बिपाशाचा एक्स बॉयफ्रेंड जॉन अब्राहमचे प्रिया रुचाल सोबत लग्न झाले.दिव्या दत्तादिव्या दत्ताने वयाची ३८वर्षे पूर्ण केली आहेत. या वयातही दिव्या सिंगलच आहे. बातम्यांनुसार, २००५ मध्ये लेफ्टनंट कमांडर संदीप शेरगिलसोबत दिव्याचा साखरपुडा झाला होता. मात्र काही कारणास्तव त्यांचे लग्न मोडले. दिव्या बी टाऊनमधील अशी एक अभिनेत्री आहे, जिच्या अफेअरची कधी चर्चा रंगली नाही.शमिता शेट्टीबॉलिवूड अभिनेत्री आणि आयपीएल टीम राजस्थान रॉयल्सची सह-मालिकन शिल्पा शेट्टीने २००९ मध्ये वयाच्या ३४ व्या वर्षी लग्न केले. तिची बहीण शमिता शेट्टी ३५ वर्षांची झाली असूनदेखील अद्याप अविवाहित आहे. २००९मध्ये क्रिकेटर शेन वार्नसोबत शमिता इंटीमेट झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या.तनिषा मुखर्जीबॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्री तनुजा यांची मोठी मुलगी आणि अभिनेत्री काजोलने वयाच्या २५ व्या वर्षीच लग्न केले होते. परंतु त्यांची धाकटी मुलगी तनिषा 35 वर्षांची झाली असून अद्याप तिने लग्न करण्याचा कोणताही विचार केलेला नाही. सिनेमामध्ये अपयश आल्यानंतर तिने बिग बॉस ७  या शोमधून टीव्ही जगतात एंट्री केली होती. या शोमध्ये स्पर्धक अरमान कोहलीसोबत तिच्या अफेरच्या बºयाच चर्चा झाल्या होत्या.नेहा धूपियाबॉलिवूडच्या हॉट आणि ग्लॅमरस अभिनेत्रींमध्ये गणली जाणारी नेहा धूपियाने पस्तीशी ओलांडली आहे. माजी मिस इंडिया असलेल्या नेहाचे रित्विक भट्टाचार्य आणि युवराज सिंगसोबत नाव जुळले. मात्र अद्याप ती अविवाहितच आहे. तिचे फिल्मी करिअरसुद्धा अ‍ॅव्हरेजच राहिले असून, सध्या ती इंडस्ट्रीमधून जणू काही गायबच आहे.