Brahmastra Ticket Price: आलिया भट ( Alia Bhatt) व रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor ) ‘ब्रह्मास्त्र’ (Brahmastra Part One: Shiva) हा चित्रपट लोकांना आवडला. हे आम्ही नाही तर आकडे सांगताहेत. दोनच आठवड्यात या चित्रपटाने 230 कोटींपेक्षा अधिक कोटींचा गल्ला जमवला. आता तिसऱ्या आठवड्यातही चित्रपट गर्दी खेचतोय आणि आता ‘ब्रह्मास्त्र’च्या मेकर्सनी प्रेक्षकांसाठी एक मोठी घोषणा केली आहे. होय, नवरात्रोत्सवानिमित्त प्रेक्षकांना कमी दरात हा सिनेमा बघता येणार आहे.
शुक्रवारी, 23 सप्टेंबरला नॅशनल सिनेमा डे (National Cinema Day) सेलिब्रेट केला गेला. या दिवशी 4 हजारांवर मल्टिप्लेक्समध्ये केवळ 75 रूपयांत चित्रपट बघण्याची संधी प्रेक्षकांना मिळाली. या संधीचा ‘ब्रह्मास्त्र’लाही प्रचंड मोठा लाभ झाला. ही संधी साधत तिसऱ्या शुक्रवारी ‘ब्रह्मास्त्र’ने 10 कोटींपेक्षा अधिकची कमाई केली. प्रेक्षकांचा हा उदंड प्रतिसाद बघता, ‘ब्रह्मास्त्र’च्या मेकर्सनी प्रेक्षक एक नवी ऑफर घेऊन आले आहेत.
होय, 26 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर या काळात नवरात्रोत्सवाच्या शुभमुहूर्तावर ‘ब्रह्मास्त्र’ केवळ 100 रूपयांत प्रेक्षकांना बघता येणार आहे. होय, म्हणजे ‘ब्रह्मास्त्र’चं तिकिट केवळ 100 रूपयांत उपलब्ध असणार आहे.‘ब्रह्मास्त्र’चा दिग्दर्शक अयान मुखर्जीने सोशल मीडियावर याची घोषणा केली. या संधीचं प्रेक्षक सोनं करतील आणि या आठवड्यात ‘ब्रह्मास्त्र’चा भरपूर आनंद घेतील, असं अयानने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
‘ब्रह्मास्त्र’चं वर्ल्डवाईड कलेक्शन‘ब्रह्मास्त्र’ने आत्तापर्यंत वर्ल्डवाईड 403 कोटींची कमाई केली आहे. भारतात हा चित्रपट लवकरच 300 कोटींचा आकडा पार करणार आहे. शनिवारच्या कलेक्शनचा आकडा मिळून ‘ब्रह्मास्त्र’ने भारतात 298 कोटींचा ग्रॉस बिझनेसने केला. शनिवारी या चित्रपटाने 5.70 कोटींचा गल्ला जमवला.येत्या 30 सप्टेंबरला हृतिक रोशनचा ‘विक्रम वेधा’ आणि पॅन इंडिया सिनेमा ‘पोन्नियिन सेल्वन पार्ट 1’ रिलीज होत आहेत. हे दोन्ही मोठे सिनेमे रिलीज होत असल्याने ‘ब्रह्मास्त्र’च्या कमाईत घट होणे अपेक्षित आहे. पण आत्तापर्यंत सिनेमाने बराच मोठा पल्ला गाठला आहे, हे नक्की.