Join us

​‘नेवी डे’ला का रिलीज झाले ‘दी गाजी अटॅक’चे पोस्टर?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2016 3:21 PM

आज(४ डिसेंबर) इंडियन नेवी डे. चित्रपटसृष्टीनेही या निमित्त शहीद जवानांना आगळी-वेगळी श्रद्धांजली वाहिली आहे. होय, इंडियन नेवी डेचे निमित्त ...

आज(४ डिसेंबर) इंडियन नेवी डे. चित्रपटसृष्टीनेही या निमित्त शहीद जवानांना आगळी-वेगळी श्रद्धांजली वाहिली आहे. होय, इंडियन नेवी डेचे निमित्त साधून ‘दी गाजी अटॅक’चे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. करण जोहर या चित्रपटाचा सहनिर्माता आहे. यापूर्वी करण सुपरडुपर हिट ‘बाहुबली’ या चित्रपटाचा सहनिर्माता राहून चुकला आहे. ‘लंच बॉक्स’ या चित्रपटाची निर्मितीही त्याने केलीय. ‘दी गाजी अटॅक’ हा चित्रपट हिंदी, तामिळ आणि तेलगू अशा तीन भाषांमध्ये तयार होतोय. राणा दग्गुबाती आणि तापसी पन्नू यात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. येत्या फेबु्रवारी महिन्यात हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहेत.  ‘दी गाजी अटॅक’ लवकरच रिलीज होतोय. मी अतिशय उत्सूक आहे, असे टिष्ट्वट करणने केले आहे. शिवाय हॅशटॅगमध्ये उर्वरित निर्मात्यांची नावेही लिहिली आहेत. चित्रपटाचे पोस्टर अतिशय आकर्षक आहे. यावरून हा चित्रपटही तितकाच रोचक आणि चित्तथरारक असणार, असा अंदाज बांधला जात आहे.  ‘दी गाजी अटॅक’चे वैशिष्ट्य म्हणजे, यात प्रथमच समुद्रावरील लढाईचे दृश्य असणार आहे. समुद्रावर लढल्या जाणाºया युद्धाचा प्रसंग असलेला हा भारतातील पहिला चित्रपट असणार आहे. त्यामुळेच नेवी डेच्या विशेष मुहूर्तावर या चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. संकल्प यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. एए फिल्म्स. मॅटिनी एंटरटेनमेंट आणि पीव्हीवी सिनेमासोबत मिळून करणने हा चित्रपट बनवला आहे. तेव्हा तुम्हीही बघा तर  ‘दी गाजी अटॅक’चे पोस्टर...