Join us

nawazuddin Siddiqui : नवाजची पत्नी आलियाने लिहिले पत्र, म्हणाली, 'सगळं विसरुन जाऊ अन्..."

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2023 10:18 AM

नवाजची पत्नी आलिया सिद्दीकी अचानक बदलली

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddhin Siddiqui) गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होता. कौटुंबिक वाद चव्हाट्यावर आल्याने त्याच्याही अडचणीत वाढ झाली होती. त्याची पत्नी आलियाने नवाजवर अनेक गंभीर आरोप लावले. नवाजने आरोप कायमच फेटाळून लावले होते. दोघांचं हे भांडण कोर्टातही गेलं होतं. आता अचानक पत्नी आलिया (Aaliya Siddiqui) बदलली असून केस परत घेणार असल्याचं बोलत आहे. तिने नवाजला एक पत्रही लिहिलं आहे.

काय लिहिलंय पत्रात?

'हॅलो नवाज..... नवाज, हे पत्र तुझ्यासाठी आहे, मी अनेक ठिकाणी ऐकले आणि वाचले आहे की आयुष्य हे चालतच पुढे जाणारे आहे. गेल्या काही महिन्यांत आपल्या दोघांमध्ये जे काही घडले, त्या सर्व गोष्टी मी विसरून जाईन, माझा देवावर विश्वास आहे, त्याच्या प्रेरणेने माझ्या चुकांची माफी मागेन, तुझ्या चुका माफ करून पुढे जाऊन भविष्य चांगले करण्याचा प्रयत्न करेन. भूतकाळात अडकणे हे चक्रव्यूहात अडकण्यापेक्षा कमी नाही. त्यामुळे हा भूतकाळ मागे सोडून अशा चुका पुन्हा न घडवण्याचे वचन देऊन मुलांचे भविष्य घडवूयात..'

तिने पुढे लिहिले,"तू एक चांगला वडील आहेस आणि आशा करते की पुढे सुद्धा तू एक चांगला पिता असण्याची सर्व कर्तव्ये पार पाडशील. मुलांना चांगले आणि उत्कृष्ट भविष्य देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करुयात. माझी सगळी लढाई फक्त आपल्या मुलांसाठी होती. त्यांच्या चेहऱ्यावरील अत्यानंद पाहून माझा राग आणि काळजी कमी झाली. नवाज, आपण बराच काळ एकत्र घालवला आहे, आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले आहेत आणि सर्व परिस्थितींवर मात केली आहे. म्हणूनच मला आशा आहे की तू आत्ता तुझ्या करिअरला खूप उच्च पातळीवर नेशील. मी  प्रार्थना करते की देव तुला आशीर्वाद देईल. गेल्या काही काळात माझ्या विचार आणि समजून घेण्याच्या पद्धतीला वेगळी दिशा दिली आहे. माझ्या देवाने मला नेहमीच एक चांगली व्यक्ती बनायला शिकवले आहे. म्हणूनच माझा देव आणि माझे अंतर्मन मला नेहमी सांगते की मी तुझ्यावर किंवा तुझ्या कुटुंबावर केलेले सर्व केस परत घ्यावेत.'

'देवाच्या सामर्थ्याने आणि मार्गदर्शनाने मी ते सर्व केस मागे घेत आहे. मला तुझ्याकडून आर्थिक मदतीची गरज नाही आणि मला तुझ्याकडून कोणतीही अपेक्षा नाही. जर देवाने हे जीवन दिले असेल तर तो मला भविष्यात जीवन जगण्याचा मार्ग नक्कीच दाखवेल. माझे कृत्य मला माझ्यासाठी चांगले भविष्य ठरवण्यास मदत करेल. फक्त एकच गोष्ट आहे की तुझं आणि माझ्या घरातला माझा हिस्सा मला विकायचा आहे आणि माझ्या चित्रपट निर्मितीदरम्यान पैसे देऊन लोकांना दिलेली आश्वासने मला पूर्ण करायची आहेत. कारण माझ्या आतला माणूस मला कोणाशीही बेईमानी करू देत नाही. म्हणूनच त्यांना पैसे देऊन मला मोकळे व्हायचे आहे. शेवटी फक्त एवढीच प्रार्थना की तुझे आरोग्य चांगले राहो, तुझ्या कुटुंबाचे आरोग्य चांगले राहो, तू आपल्या मुलांचीसुद्धा चांगली काळजी घे, हीच प्रार्थना. आपण चांगले पती-पत्नी बनवू शकलो नाही, पण आशा आहे की आपण चांगले पालक होऊ.'

टॅग्स :नवाझुद्दीन सिद्दीकीपरिवारन्यायालय