Join us

'पहिल्या पतीसोबत अद्याप घटस्फोट घेतला नाही', नवाजुद्दीनचा पलटवार; कौटुंबिक वादाला नवे वळण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2023 17:11 IST

बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीच्या कुटुंबातील कलह चव्हाट्यावर आला आहे.

Nawazuddin Siddiqui  बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीच्या कुटुंबातील कलह चव्हाट्यावर आला आहे. नवाजुद्दीनची आई मेहरुनिस्सा आणि पत्नी आलिया दोघींनी एकमेकींवर आरोप करत तक्रार दाखल केली आहे. या सर्व प्रकरणात नवाजुद्दीनची कोणतीच प्रतिक्रिया समोर आली नव्हती. आता मात्र नवाजुद्दीनच्या वकीलांना पत्रकार परिषद घेत अभिनेत्याची भूमिका मांडली आहे. या पत्रकार परिषदेत नवाजुद्दीनची पत्नी आलियावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

आलियाने पहिल्या पतीपासून अद्याप घटस्फोट घेतला नाही 

नवाजुद्दीनचे वकील नदीम जफर जैदी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, 'नवाजला पती म्हणणारी आलिया उर्फ अंजली उर्फ गायत्री उर्फ कामाक्षा उर्फ जैनब उर्फ अंजना पांडे ही अशी मुलगी आहे जिने तिच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी अनेक अवैध कामं केली आहेत. तिचे खरं नाव अंजना किशोर पाण्डे असे आहे. तिचा जन्म १८ एप्रिल १९७९ चा आहे मात्र तिने पासपोर्टवर १८ एप्रिल १९८२ लिहिले आहे. अंजनाचे २८ एप्रिल २००१ रोजीच मध्य प्रदेश मधील जबलपूरचा निवासी असलेल्या विनय भार्गव सोबत लग्न झाले आहे. तो रेल्वे विभागात तिकीट कलेक्टर आहे. विनयसोबत लग्न झालेले असतानाही अंजनाने २०१० मध्ये नवाज सोबत जैनब बनून विवाह निकाह केला. जेव्हा की अंजना आणि विनयचा अद्याप घटस्फोट झालेला नाही.'

Nawazuddin Siddiqui : नवाजुद्दीन सिद्दीकीच्या आईची सुनेविरोधात पोलिसात तक्रार, जाणून घ्या काय आहे प्रकरण

जैदी पुढे सांगतात, '२०११ मध्येच नवाज आणि आलियाचा घटस्फोट झाला. एका फेसबुक पोस्ट अनुसार २००८-०९ मध्येच अंजना राहुल नामक व्यक्तीसोबत प्रेमविवाह केला. दोघेही मुंबईत गोरेगाव येथील एका फ्लॅटमध्ये सोबत राहत होते. अंजनाला मुंबईत राहून आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करायच्या होत्या. तर तिकडे विनय भार्गवने अंजनाच्या बहिणीसोबत लग्न केले तिचे नाव अर्चना भार्गव. ती आधीच राजकुमार शुक्लाची पत्नी होती. विनय भार्गवने अंजनाचे नाव आधीच रेल्वे विभागात पत्नी म्हणून नोंद केले होते. यानंतर अर्चना सोबत लग्न करुन तिचेही नाव पत्नी म्हणून नोद करण्याचा त्याचा प्रयत्न असताना रेल्वे विभागाला पडताळणीत समजले. तिघांनी मिळून रेल्वे विभागालाही फसवले होते. माझ्याजवळ याचे पुरावे आहेत.'

Nawazuddin siddiqui : आई-पत्नी भांडतात, नवाजुद्दीन सिद्धीकीवर हॉटेलमध्ये राहण्याची वेळ

नवाजच्या पर्सनल लाईफमध्ये वाद सुरू असले तरी प्रोफेशनल लाईफमध्ये तो एक मोठा स्टार आहे. लवकरच तो हड्डी या सिनेमात झळकणार आहे. यात नवाज तृतीयपंथियाची भूमिका साकारताना दिसणार आहे.

टॅग्स :नवाझुद्दीन सिद्दीकीपरिवारपोलिससोशल मीडिया