Join us

नवाजुद्दीन सिद्दीकीचा चिमुकला बनला नटखट नंदलाल, पहा फोटो !

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2017 4:09 PM

एकीकडे एका हिंदुत्ववादी पक्षाने महाराष्ट्रात ‘रामलीला’मध्ये मुस्लीम समाजातील कलाकारांना काम करण्यास बंदी घातलेली असताना बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याने ...

एकीकडे एका हिंदुत्ववादी पक्षाने महाराष्ट्रात ‘रामलीला’मध्ये मुस्लीम समाजातील कलाकारांना काम करण्यास बंदी घातलेली असताना बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याने आपल्या मुलाला भगवान कृष्णाची वेशभूषा करून एक नवा आदर्श निर्माण केला आहे. विशेष म्हणजे नवाजने आपल्या मुलाचा कृष्णाच्या वेशभूषेतील फोटो ट्विटरवर शेअर केला असून, कॅप्शनमध्ये मी खूप खूश असल्याचे म्हटले आहे. नवाजने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘मी माझ्या मुलाच्या शाळेमुळे खूपच आनंदी आहे. कारण माझ्या मुलाला शाळेने ‘नटखट नंदलाल’ बनण्याची संधी दिली.’ नवाजच्या या ट्विटचे आणि त्याच्या चिमुकल्यांचे नेटिझन्सकडून कौतुक केले जात असून, नवाजने आपल्या मुलाला अशाप्रकारची वेशभूषा साकारून सर्व-धर्म-समभावचा संदेश दिल्याच्या प्रतिक्रिया यूजर्सकडून व्यक्त केल्या जात आहेत. खरं तर कलाकाराला कुठलाही धर्म नसतो. हाच आदर्श नवाजने घालून दिल्याचे त्याच्या ट्विटवरून दिसून येत आहे. असो, नवाजच्या प्रोफेशनल लाइफविषयी बोलायचे झाल्यास, लवकरच तो ‘बाबूमोशाय बंदूकबाज’ या चित्रपटात एका डॅशिंग भूमिकेत बघावयास मिळणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री दिव्या दत्ता आणि बंगाली अभिनेत्री बिदिता बेग यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाची कथा नवाजचे मित्र, प्रेम आणि दुश्मिनी याच्याभोवती फिरणारी आहे. कुशन नंदी यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला असून, त्यामध्ये नवाजचा अंदाज बघण्यासारखा आहे. नवाजने दिलेले इंटिमेंट सीन्स सध्या चर्चेत आहेत. दरम्यान, या चित्रपटाला सेन्सॉरने कात्री लावली असून, तब्बल ४८ सीन्स कट करण्याचे आदेश सेन्सॉरने दिले आहेत. दरम्यान, चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत असल्याने नवाज समाधानी आहे; मात्र त्याचबरोबर सेन्सॉरच्या निर्णयामुळे तो निराश आहे.