Join us

नवाजुद्दीन सिद्दीकीचे टॉलिवूडमध्ये पदार्पण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2018 08:00 IST

नवाजुद्दीन सिद्दीकी ‘थलायवर १६५’ चित्रपटातून तमीळ इंडस्ट्रीत एन्ट्री करणार आहे.

ठळक मुद्दे नवाजुद्दीन सिद्दीकी ‘थलायवर १६५’मधून टॉलिवूडमध्ये एन्ट्री नवाजुद्दीन करणार थलायवासोबत काम

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीची सेक्रेड गेम्स ही नेटफ्लिक्सवरील वेबसीरिज प्रेक्षकांना खूप भावली आणि त्यातील नवाजच्या कामाचे सगळीकडून खूप कौतूक झाले. या सीरिजनंतर आता नवाजुद्दीन सिद्दीकी टॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. तो ‘थलायवर १६५’  चित्रपटातून तमीळ इंडस्ट्रीत एन्ट्री करणार आहे. नवाजुद्दीनसोबत सुपरस्टार रजनीकांतही दिसणार आहेत. यासंदर्भातील माहिती त्याने इंस्टाग्रामवरून दिली.

नवाजुद्दीन सिद्दीकीने एक पोस्ट लिहीत फोटो शेअर केला आहे. यामध्ये नवाजुद्दीन लिहिले की, थलायवर १६५ तमीळ चित्रपटासाठी रिहर्सल करत असून सुपरस्टार थलायवासोबत काम करण्याचा आनंद होत आहे. सोबत एक स्क्रिप्ट घेऊन वाचतानाचा फोटो शेअर केला आहे.

थलायवर १६५ या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी, रजनीकांत यांच्यासह विजय सेतूपती, बॉबी सिम्हा, सिमरन, सनथ रेड्डी, मुनिक्षनाथ, मेघ आकाश, दीपक रमेश यासारखे कलाकार झळकणार आहेत. तर चित्रपटाचे दिग्दर्शन कार्तिक सुब्बाराज करत आहेत.

दरम्यान, नवाजुद्दीन सिद्दीकीचा आताच रिलीज झालेल्या ‘जिनियस चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १० कोटींचा गल्ला जमविला आहे. तर नवाजुद्दीनची मध्यवर्ती भूमिका असणारा आगामी उर्दू लेखक सादत हसन मंटो यांच्यावर आधारीत मंटो चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. . या सिनेमात नवाजुद्दीनच्या पत्नीची भूमिका अभिनेत्री रसिका दुग्गलने साकारली आहे. त्यासोबतच परेश रावल, ऋषी कपूर, ताहिर राज यांच्यासह अनेक कलाकार यात बघायला मिळणार आहेत. येत्या २१ सप्टेंबरला हा सिनेमा रिलीज होणार आहे. आगामी काळात नवाज वेगवेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याचा हा अंदाज रुपेरी पडद्यावर पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

टॅग्स :नवाझुद्दीन सिद्दीकीTollywood