Nawazuddin Siddiqui : बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी सध्या त्याच्या कौटुंबिक वादामुळे चर्चेत आहे. त्याची पत्नी आलियाने सासूविरोधात तक्रार केली आहे तर सासूने देखील सूनेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. प्रॉपर्टीवरुन हा वाद होत असल्याची चर्चा सुरु आहे. याबाबत आता आलियाचे वकील रिजवान सिद्दीकीने एक व्हिडिओ शेअर केला होता ज्यात बॉडीगार्ड त्यांना घरात जाऊ देत नव्हते. आता वकीलांनी आणखी एक धक्कादायक आरोप केला आहे.
आलिया सिद्दीकीचे वकील रिजवान सिद्दीकी यांनी सांगितले, 'माझी क्लाएंट आलिया सिद्दीकी २२ जानेवारी रोजी नवाजला भेटायला वर्सोवा येथील घरी गेली होती. तिला कौटुंबिक वादावर चर्चा करायची होती. विशेष म्हणजे हा वाद प्रॉपर्टीवरुन नाहीच आहे. खरा वाद वेगळा आहे. या वादाचं कारण त्यांची मुलगी जोहरा आहे. छोट्या मुलीचं कारण आहे त्यामुळे ते असं पब्लिकली नाही सांगता येणार. '
ते पुढे म्हणाले, 'आलिया जेव्हा नवाजच्या घरी पोहोचली तेव्हा नवाज तिला भेटलाच नाही. तिचे फोनही घेतले नाहीत. सध्या आलिया नवाजच्या घरीच आहे आणि कधी तो शूटिंगवरुन परत येतो याची वाट पाहत आहे.'
'आलिया दोन वर्षांआधीच मुलांसोबत दुबईला शिफ्ट झाली आहे. त्यांनी दुबईला राहावे हा निर्णयही नवाजचा होता. तिथेच मुलांचं शिक्षण सुरु आहे. आधी नवाज पैसे पाठवत होता, मात्र काही दिवसांपासून त्याने पैसे पाठवणे बंद केले. आर्थिक पाठिंब्याशिवाय क्लाएंट एकटी काय करणार. '
नवाजच्या वैयक्तिक आयुष्यात जरी वाद सुरू असले तरी प्रोफेशनल लाईफमध्ये तो एक मोठा स्टार आहे. लवकरच तो 'हड्डी' या सिनेमात झळकणार आहे. यात नवाज तृतीयपंथियाची भूमिका साकारताना दिसणार आहे.