Nawazuddin Siddiqui : बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी सध्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत आहे. दोन दिवसांपूर्वीच नवाजच्या दुबईतील घरी असलेल्या मोलकरणीने व्हिडिओ शेअर करत अभिनेत्यावर गंभीर आरोप केले. खायला पैसे नाही, मला इथून बाहेर पडायचे आहे असं म्हणत सपना रॉबिनने नवाजुद्दिनवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. मात्र आता ती खोटं बोलत असल्याचं स्पष्ट झालं आहे. सपनाने स्वत:च आणखी एक व्हिडिओ शेअर करत माझ्यावर दबाव असल्याचे सांगितले.यावर आता नवाजच्या भावाने मात्र अभिनेत्यालाच जबाबदार धरले आहे.
सपना रॉबिनने माफी मागितल्यानंतर नवाजचा भाऊ शमास सिद्दीकीने ट्वीट केले की,'स्क्रिप्टेड आहे हे! कितीला खरेदी करणार? बॅंक बॅलन्सही संपायचा. आता तर तुझे कामही बंद पडले आहे. रखडलेल्या सिनेमांमुळे फिल्म इंडस्ट्रीमध्ये १५० कोटी रुपये अडकले आहेत.खरंय, भंगार, बकरे विकणारेच याला हाकत नरकापर्यंत जातील .' याचाच अर्थ नवाजने सपना ला पैसे देऊन खोटं बोलायला लावल्याचा आरोप भाऊ शमासने केला आहे.
अशा भाषेत शमासने भावाबद्दल ट्वीट करत रागवव व्यक्त केला आहे. यावर अद्याप अभिनेत्याकडून कोणतीच प्रतिक्रिया आलेली नाही.शमास आणि नवाज यांच्यात गेल्या अनेक काळापासून मतभेद सुरु आहेत. काही वर्षांपूर्वी शमास नवाजचे सर्व काम बघत होता. नवाजचा मुख्य भूमिका असलेला 'बोले चुडिया' या सिनेमाचे दिग्दर्शनही नवाजने केले होते.
नेमकं प्रकरण काय ?
नवाजुद्दिनची पत्नी आलिया आणि आई मेहरुन्निसा यांच्यात वादाला सुरुवात झाली. संपत्तीवरुन दोघींमध्ये वाद झाले. दोघींनी एकमेकींविरोधात तक्रारही दाखल केली आणि नवाजचा हा कौटुंबिक वाद चव्हाट्यावर आला.आलियाने वकिलांच्या मार्फत नवाजवर आणि त्याच्या आईवर गंभीर आरोप केले. नवाजनेही यानंतर आलियाचे खरे रुप काय हे समोर आणत तिचे चारित्र्यच उघड केले. आलिया दुबईतून मुंबईत परत आली आणि हा सर्व वाद सुरु झाला.
नवाज लवकरच 'हड्डी' सिनेमात दिसणार आहे. यामध्ये त्याने ट्रांसजेंडरची भूमिका केली आहे.