बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहने (Ranveer Singh) 'बँड बाजा बारात' सिनेमातून पदार्पण केलं होतं. या दिल्लीच्या पोराने पहिल्याच सिनेमातून प्रेक्षकांचं मन जिंकलं होतं. सिनेमातही रणवीरला दिल्लीच्या मुलाची भूमिका साकारायची होती. त्यामुळे बोलायची पद्धत, उच्चार, टोन हे सर्व त्याने अगदी चपखल केलं. या सिनेमामुळे रणवीरचं नशीबच चमकलं. आणि यात अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकाचाही (Nawazuddin Siddiqui) मोठा वाटा आहे. कसं ते बघा.
नवाजुद्दीन सिद्दीकीने रणवीरला बँड बाजा बारातच्या वेळी प्रशिक्षण दिलं होतं. होय ही गोष्ट स्वत: नवाजने सांगितली आहे. नवाज म्हणाला, 'त्यावेळी एक सिनेमा बनत होता बँड बाजा बारात. त्यासाठी मी त्यातल्या अभिनेत्याला ट्रेनिंग दिली होती. मी तेव्हा अभिनयाचे धडे द्यायचो. यशराज फिल्म्सकडे मी काम करायचो. पण ते काम मी काही दिवसच केलं आणि नंतर मला दुसरीकडे काम मिळालं. त्यानंतर ट्रेनिंगची जबाबदारी दुसऱ्या अभिनेत्याकडे गेली.'
नवाजने सांगितल्यानंतर एक गोष्ट तर स्पष्ट झाली की रणवीरच्या यशात नवाजचाही हात आहे. या फिल्ममुळे रणवीरच्या करिअरला चार चॉंद लावले. गंमत म्हणजे रणवीर सिंह आणि नवाजने आजपर्यंत एकत्र काम केलेलं नाही. दोघांच्या चाहत्यांना आता दोन्ही स्टार्स कधी एकत्र येणार याची उत्सुकता लागली आहे.
रणवीर सिंह लवकरच करण जोहरच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' सिनेमात दिसणार आहे. यामध्ये पुन्हा एकदा आलिया भटसोबतची त्याची जोडी आहे. रणवीर आणि आलियाने 'गली बॉय' सिनेमात एकत्र काम केलं होतं. 28 जुलै रोजी 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' रिलीज होत आहे. यामध्ये जया बच्चन, शबाना आजमी आणि धर्मेंद्र हे दिग्गज कलाकारही आहेत.