अभिनेता नवाजुद्दिन सिद्दीकीच्या अडचणी दिवसेंदिवस वाढतच आहेत. आधी पत्नीने गंभीर आरोप लावल्यानंतर आता दुबईत असलेल्या मोलकरणीने व्हि़डिओ शेअर करत तक्रार केली आहे. अभिनेत्याच्या दुबईतील घरी घरकाम करणारी एक महिला सपना रॉबिन हिचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत सपना रडत रडतच नवाजुद्दीन विरोधात तक्रार करत आहे आणि मदतीची अपेक्षा करत आहे.
नवाजुद्दीनची पत्नी आलियाचे वकील रिजवान यांनी ट्विटरवर व्हिडिओ शेअर केला आहे. सोबतच एक लांबलचक स्टेटमेंटही जारी केले आहे. यात लिहिले आहे की, अभिनेत्याने चुकीच्या पद्धतीने तिला कामावर घेतले होते. वकीलाने दावा केला की, नवाजुद्दीनने दुबईच्या रेकॉर्डमध्ये सपना एका अज्ञात कंपनीत सेल्स मॅनेजरची नोकरी करते. जेव्हा की ती खरंतर त्याने मुलांच्या देखरेखीसाठी तिला ठेवले होते. सपना नवाजुद्दीनची पत्नी आणि मुलांसह दुबईत राहत होती.
सपनाने रडत रडतच व्हिडिओ बनवला आहे. यात ती म्हणते, 'मी नवाजुद्दीन यांच्या घरी काम करते. मॅडम गेल्यानंतर सरांनी मला व्हिसा दिला होता आणि सांगितले की ते माझ्या व्हिसाचे पैसे पगारतून कापतील. पण मला दोन महिने झाले पगार मिळालेला नाही.यामुळे मला परेशानीला सामोरे जावे लागत आहे. आता सुद्धा मी घरी एकटी आहे. मला खायला काही नाहीए आणि एक पैसाही नाहीए. माझी विनंती आहे मला इथून बाहेर निघायचे आहे आणि माझा पगार मला हवा आहे. मला भारतात घरी जायचे आहे. मला तिकीट आणि पगार द्या.'
पत्नी आणि आता मोलकरणीच्या आरोपांनंतर नवाजुद्दीनकडून काय उत्तर येते हे बघणे महत्वाचे आहे. मात्र सध्या नवाजुद्दीनचा कौटुंबिक वाद चव्हाट्यावर आल्याचं दिसत आहे. नवाजुद्दीन आगामी 'हड्डी' या सिनेमात दिसणार आहे. यामध्ये त्याने ट्रांसजेंडरची भूमिका साकारली आहे.