Join us  

बिजली गिराने मैं हूँ आई! आयटम गर्लच्या वेशातील 'या' अभिनेत्याला ओळखलं का?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2022 12:38 PM

Nawazuddin siddiqui : या फोटोमध्ये तो चक्क एका आयटम गर्लच्या रुपात दिसत असून तो स्टेजवर परफॉर्मन्स करत आहे.

कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटी आपल्यातील कलागुणांना वाव मिळावा यासाठी अनेकदा नवनवीन प्रयोग करु पाहत असतात. यात अनेक अभिनेत्री बोल्ड भूमिका करतात. तर, काही अभिनेते स्त्री वेशात प्रेक्षकांसमोर सादर होतात. आतापर्यंत अनेक अभिनेत्यांनी स्त्री भूमिका लिलया पार पाडल्याचं आपण पाहिलं आहे. यात श्रेयस तळपदे, अक्षय कुमार,सचिन पिळगांवकर अशा कितीतरी कलाकारांनी स्त्री वेश धारण करुन चित्रपटातील भूमिका गाजवल्या आहेत. यामध्येच सध्या सोशल मीडियावर अशाच एका अभिनेत्याचा फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये हा अभिनेता चक्क आयटम गर्लच्या वेशात असल्याचं पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे त्याचा फोटो पाहून अनेकांनी त्याला ओळखलंदेखील नाही.

सध्या सोशल मीडियावर अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (nawazuddin siddiqui) याचा एक फोटो व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे या फोटोमध्ये तो चक्क एका आयटम गर्लच्या रुपात दिसत असून तो स्टेजवर परफॉर्मन्स करत आहे.  परंतु, त्याचा हा फोटो पाहिल्यावर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. अनेकदा गंभीर भूमिका साकारणार नवाजुद्दीन चक्क स्त्री वेशात काय करतोय असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.

..म्हणून नवाज दिसतोय आयटम गर्लच्या वेशात

नवाजुद्दीन लवकरच टीकू वेड्स शेरू या आगामी चित्रपटात झळकणार आहे. सध्या या चित्रपटाचं चित्रीकरण सुरु आहे. या चित्रपटासाठी नवाजुद्दीनने आयटम गर्लचा लूक केला असून त्याचा हा फोटो चांगलाच चर्चेत आला आहे. या फोटोमध्ये त्याने गोल्डन गाऊन घातला आहे, सोबतच डोक्यावर मुकूटही घातला आहे.

'प्रचंड हॉट', अशी कमेंट करत कंगना रणौतनेदेखील तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये नवाजुद्दीनचा हा फोटो शेअर केला होता. तसंच त्याचा आणखी एक फोटो शेअर करत 'बिजली गिराने मैं हूँ आई', असंही तिने म्हटलं होतं. इतकंच नाही तर त्याचा हा फोटो पाहून अनेकांनी त्यावर वेगवेगळ्या कमेंट केल्या आहेत.

दरम्यान, नवाजुद्दीनची मुख्य भूमिका असलेला टीकू वेड्स शेरु, या चित्रपटाची निर्मिती कंगणाच्या मणिकर्णिका प्रोडक्शन हाऊस अंतर्गत होत आहे. या चित्रपटाव्यतिरिक्त नवाज लवकरच 'अद्भुत', 'नो मॅन्स लँड', 'जोगीरा सारारा' या चित्रपटांमध्ये झळकणार आहे.

टॅग्स :नवाझुद्दीन सिद्दीकीसेलिब्रिटीबॉलिवूडसिनेमाकंगना राणौत