अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याची गणना इंडस्ट्रीमधील सर्वोत्कृष्ट कलाकारांमध्ये केली जाते. त्याच्याबरोबर काम करून आज प्रत्येक कलाकार आपले नशिबवान समजतो, पण नवाजला येथे पोहोचण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला आहे. सिनेमात चोराची भूमिका साकारण्यापासून ते पोलिस अधिकारी होण्याचा हा प्रवास नवाजसाठी फारच कठीण होता.
अभिनेत्याने नेहमी दिलेल्या मुलाखतीत त्याला करावे लागणा-या संघर्षाबद्दल उल्लेख करत असतो. मुळात एक किस्सा नेहमीच नावजच्या स्मरणात राहिल असा आहे. कमल हासनला मी माझा आदर्श मानतो. त्यांच्या ‘राम राम’ चित्रपटात मी त्यांचा हिंदी भाषेच्या प्रशिक्षकाची भूमिका साकारली होती. कमल हासनच या चित्रपटाचे दिग्दर्शनही करत होते आणि मुख्य अभिनेतेही तेच होते. जेव्हा कमल हासन यांनी मला त्या चित्रपटात एका छोट्या भूमिकेची ऑफर दिली तेव्हा मला खूप आनंद झाला मी खूप उत्सुक होतो.
नवाजुद्दीन सिद्दीकी म्हणाला की, माझी आजी खालच्या जातीची होती, तर माझे संपूर्ण कुटुंब शेख होते. यामुळे गावातील लोक अजूनही माझ्या कुटूंबाकडे चांगल्या नजरेने पाहत नाहीत.' यावेळी नवाजने शहरी भागातील जातीय संस्कृती आणि ग्रामीण भागातील जातीय संस्कृती याबाबत भाष्य केले. तो असे म्हणाला की शहरी भागात जरी काही प्रमाणात जातीव्यवस्था गौण असली तरी ग्रामीण भागात त्याचा पगडा अजूनही पहायला मिळतो. एकाच समुदायामध्ये छोट्या-मोठ्या जातींमध्ये भेदभाव केला जातो.