अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी त्याच्या खासगी आयुष्यामुळे बराच चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वी नवाजने आपल्या पत्नीचा सीडीआर (कॉल डिटेल्स रेकॉर्ड्स) काढल्याची माहिती समोर आली आहे. या बातमीने संपूर्ण इंडस्ट्रीत खळबळ माजली होती. अर्थात ही बातमी खोटी असल्याचा खुलासा नवाजने केला होता. त्याआधी नवाजुद्दीन सिद्दीकीच्या ‘अॅन आॅर्डिनरी लाईफ’ या बायोग्राफीने वाद निर्माण केला होता. या वादामुळेच प्रकाशनानंतर उण्यापु-या आठ दिवसांत नवाजुद्दीनला ही बायोग्राफी बाजारातून मागे घ्यावी लागली होती. पूर्वप्रेयसींची माफी मागून नवाजने ही बायोग्राफी बाजारातून मागे घेत असल्याचे जाहिर केले होते. ‘माझ्या बायेग्राफीमुळे ज्यांच्याही भावना दुखावल्या गेल्या असतील, त्या सर्वांची मी माफी मागतो. मला या गोष्टीचा पश्चाताप असून मी हे पुस्तक मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे,’ असे त्याने म्हटले होते.
नवाजुद्दीन सिद्दीकीच्या ‘रोमारोमात’ भिनलीय ही मुलगी...वाचा काय आहे, मिस्ट्री!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2018 1:05 PM