Join us

नवाजुद्दीन सिद्दीकी बनणार क्रिकेट कोच! रणवीर सिंगसोबत जमणार जोडी!!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2018 10:34 AM

दिग्दर्शक कबीर खान लवकरच 1983 साली भारतीय संघाने जिंकलेल्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा प्रवास पडद्यावर उलगडणार आहे. या चित्रपटासाठी अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीशी संपर्क करण्यात आल्याचे कळतेय.

दिग्दर्शक कबीर खान लवकरच 1983 साली भारतीय संघाने जिंकलेल्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा प्रवास पडद्यावर उलगडणार आहे. या चित्रपटात अभिनेता रणवीर सिंग हा कपिल देव यांची भूमिका साकारणार आहे, हे तर तुम्हाला ठाऊक आहेच. आता या आगामी चित्रपटातील अन्य स्टारकास्टची नावेही हळूहळू समोर येत आहे. होय, या चित्रपटासाठी अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीशी संपर्क करण्यात आल्याचे कळतेय. मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार, नवाजुद्दीनने हा प्रस्ताव स्वीकारल्यास तो या चित्रपटात भारतीय क्रिकेट टीमच्या तत्कालीन प्रशिक्षकाची भूमिका वठवताना दिसेल.

 नवाजुद्दीनने आधीही कबीर खानसोबत काम केले आहे. कबीर खान दिग्दर्शित ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटात नवाजने पत्रकाराशी भूमिका साकारली होती.कपिल देव यांनी 1983 साली भारताला क्रिकेटमध्ये पहिला वर्ल्ड कप जिंकून दिला होता. कपिल देव या संघाचे कर्णधार होते. त्यांच्याच नेतृत्वाखाली भारतीय संघाने वेस्ट इंडिजला धूळ चालत विश्वचषकावर नाव कोरले होते. या चित्रपटाचे शूटींग लवकरच सुरू होईल, अशी अपेक्षा आहे. आॅगस्ट 2019 मध्ये हा चित्रपट रिलीज होईल, असेही मानले जात आहे. अद्याप कबीर खान यांनी या चित्रपटाची अधिकृत घोषणा केलेली नाही. पण तसाचं इन्कारही केला नाही.तूर्तास कबीर खान यांच्या डोळ्यापुढे भारतीय टीमच्या कोचच्या भूमिकेत नवाजचे नाव आहे. टीममधील अन्य खेळाछूंच्या भूमिकेत कोण कलाकार असतील, हे मात्र कळले नाही. एक मात्र खरे की, नवाजने होकार दिल्यास, चित्रपटाच्या निमित्ताने रणवीर सिंग आणि नवाजुद्दीन सिद्दीकी ही जोडी पहिल्यांदा प्रेक्षकांना दिसेल आणि या जोडीला पाहणे प्रेक्षकांसाठी आनंद द्विगुणित करणारी गोष्ट असेल.

 

टॅग्स :नवाझुद्दीन सिद्दीकी