Join us

"डिप्रेशन हा शहरी आजार, गावात.." नवाजुद्दीनचं स्पष्ट मत; म्हणाला, "वडिलांना कळलं तर..."

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2023 3:21 PM

मी जर वडिलांना डिप्रेस्ड झालो असं सांगितलं तर ते मला चापट मारतील.

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui)  सध्या 'जोगीरा सारा रा' सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. दरम्यान तो अनेक ठिकाणी मुलाखती देत आहे. अशाच एका मुलाखतीत त्याने डिप्रेशनवर एक वक्तव्य केलंय जे नक्कीच विचार करायला लावणारं आहे.  डिप्रेशन हा शहरी आजार असून गावात कोणालाही होत नाही असं तो म्हणालाय.

Marshable India ला दिलेल्या मुलाखतीत नवाजुद्दीन म्हणाला, "डिप्रेशन ही शहरी कॉन्सेप्ट आहे. गावातील लोकांना हे होत नाही. मी जर वडिलांना डिप्रेस्ड झालो असं सांगितलं तर ते मला चापट मारतील. मी ज्या ठिकाणाहून येतो तिथे डिप्रेशनचं नाव काढणंच मोठी चूक ठरेल. तिथे कोणालाच डिप्रेशन येत नाही. सगळे आनंदी असतात. पण जेव्हा मी शहरात आलो तेव्हा मला एंक्झायटी, डिप्रेशन, बायपोलर याबद्दल कळालं."

तो पुढे म्हणाला, 'डिप्रेशन हा शहरी आजार आहे. इथे प्रत्येक जण आपल्या छोट्यातल्या छोट्या भावनेला खूपच वाढवून सांगतो. आता एखादा मजूर किंवा फूटपाथवर राहणाऱ्या माणसाला विचारा की डिप्रेशन काय आहे. त्याला नाही माहित. जेव्हा पाऊस पडतो तेव्हा ते त्यातही नाचतात. त्यांना अजिबातच डिप्रेस्ड वाटत नाही. जेव्हा तुमच्याकडे पैसे येतात तेव्हा त्यासोबत अशा प्रकारचा आजारही येतो."

नवाजुद्दीनचा 'जोगीरा रा रा' सिनेमा २६ मे रोजी प्रदर्शित होत आहे. याआधी सिनेमा १२ मे रोजी रिलीज होणार होता मात्र केरळ स्टोरीचं यश पाहता तारीख पुढे ढकलण्यात आली. या सिनेमात नवाजुद्दीन सोबत अभिनेत्री नेहा शर्मा दिसणार आहे. ही एक कॉमेडी फिल्म आहे. तसंच संजय मिश्रा आणि महाक्षय चक्रवर्ती देखील मुख्य भूमिकेत असणार आहेत.

टॅग्स :नवाझुद्दीन सिद्दीकीबॉलिवूड