बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddhiqui) त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत आहे. पत्नीने केलेल्या आरोपांमुळे नवाजचा कौटुंबिक वाद चव्हाट्यावर आला आहे. दरम्यान नवाजने आगामी सिनेमाच्या प्रमोशननिमित्ताने दिलेली मुलाखत चर्चेत आहे. मला संन्यास घ्यायचा आहे असं वक्तव्य त्याने मुलाखतीत केलंय. नवाजला नक्की काय म्हणायचंय..?
नवाजुद्दीन सिद्दीकी आगामी 'जोगीरा सारा रा रा' या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. दरम्यान एका मुलाखतीत तो म्हणाला,"माणूस नेहमीच स्वत:ची वकिली करत राहतो आणि दुसऱ्यांसाठी मात्र जज बनतो. मला संन्यासी व्हायचं आहे. मी आयुष्यात अनेक जुगाड केले पण आता मला सगळं ठीक व्हावं असं वाटतं. मी आज अभिनेता नसतो तर संन्यासी असलो असतो."
नवाज पुढे म्हणाला,"मी कदाचित निघूनही जाईल आणि तुम्हाला बातम्यांमधून कळेल. जिथे मी एकटा असेल अशा ठिकाणी बसून विचार करायला मला आवडतं. मी लिहित नाही फक्त अभिनय करतो. मी प्रत्येक ठिकाणी खूश राहतो. जर माझ्या अनुभवाचा थोडा अंशही बाहेर आला तरी मी स्वत:ला नशीबवान समजेल."
नवाज कॉमेडी भूमिका का करत नाही?
कॉमेडी भूमिकेत का दिसत नाही यावर नवाज म्हणाला,"कॉमेडीमध्ये जसा मी होतो, राजपाल होता, विजय राज होता आमचा मोठा ग्रुप होता. मजामस्ती चालायची. आता माझा चेहरा बघून तर लोकांना मी कॉमेडियन वाटणार नाही म्हणून मी वेगळे रोल करायचो. राजपालला तर बघूनच विनोदी वाटतं.