बॉलिवूड अभिनेता नवाझुद्दील सिद्दीकी गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. आधी लॉकडाऊनमध्ये आपल्या गावी गेल्याने तो चर्चेत आला. यानंतर पत्नी आलिया सिद्दीकी हिने लॉकडाऊनमध्ये घटस्फोटाची नोटीस पाठवल्यामुळे त्याची चर्चा सुरु झाली. पत्नीने नवाजला घटस्फोटाची नोटीस पाठवल्याची बातमी सुरूवातीला अनेकांना अफवा वाटली, मात्र आता खुद्द आलियाने ही बातमी कन्फर्म केली आहे. या घटस्फोटाचे कारणही तिने सांगितले आहे.होय, बॉम्बे टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत या घटस्फोटामागची पार्श्वभूमी तिने सांगितली, तिने सांगितले, ‘हा घटस्फोट घेण्यामागे अनेक कारणे आहेत. जे मी सध्या तरी लोकांपुढे आणू इच्छित नाही. पण लग्नानंतर लगेच आमच्यात मतभेद निर्माण झाले होते, दहा वर्षांपासूनच या मतभेदांची सुरुवात झाली होती.’
आलिया म्हणते,
आमच्या पूर्वापार तणाव होता. मी एक पत्नी म्हणून खूप सा-या गोष्टींकडे दुर्लक्ष केले. कारण तो सेलिब्रिटी आहे आणि मी याबाबत बोलले असते, तर आणखी वाद झाले असते. हे नाते वाचवण्यासाठी मी खूप प्रयत्न केलेत मात्र त्यांच्याकडून कुठलाही सकारात्मक प्रतिसाद मिळाली नाही. त्यांचा पॉझिटिव्ह अॅटिट्युड मला कधीच वाटला नाही. तसेही आम्ही खूप दिवसांपासून वेगळे राहत आहे आणि मुलं माझ्यासोबत आहेत. लॉकडाऊनमध्ये त्यांनी माझी आणि मुलांची साधी विचारपूसही केली नाही, असेही आलियाने सांगितले.
लॉकडाऊनमध्येच घटस्फोटाची नोटीस का?आलियाने लॉकडाऊनमध्येच घटस्फोटाची नोटीस पाठवली. लॉकडाऊनमुळे पोस्ट आॅफिस बंद आहे आणि स्पीड पोस्टमार्फत नोटीस पाठवण्याची सुविधा नाही. त्यामुळे व्हाट्स अॅप आणि ई-मेलवर नोटीस पाठवण्याचा मार्ग तिने निवडला. अशात आलियाने घटस्फोटाची नोटीस पाठवण्यासाठी लॉकडाऊनचाच काळ का निवडला? असा प्रश्न अनेकांना पडल्याशिवाय राहिला नाही. आलियाने त्यावरही खुलासा केला. लॉकडाऊनच्या 2 महिन्यांच्या काळात मला विचार करायला भरपूर वेळ मिळाला. लग्नाच्या नात्यात आत्मसन्मान गरजेचा असतो. माझ्या या आत्मसन्मानालाच इतकी वर्षे ठेच पोहाचवली गेली. मी काहीही नाही, अगदी शून्य आहे, याची मला पदोपदी जाणीव करून देण्यात आली. नवाजच्या भावालाही माझ्यामुळे अडचण होती. अखेर मी या नात्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. मी आता माझे नाव बदलून अंजना किशोर पांडे केले आहे. मी कुणाचे नाव वापरून त्या नावाचा फायदा घेतेय, असे कुणाला वाटायला नको म्हणून मी माझे नाव बदलत आहे, असे आलियाने सांगितले.
हवी मुलांची कस्टडीमी भविष्याचा फार विचार केलेला नाही. जे होईल ते बघेल. पण आता हे लग्न टिकवण्यात मला जराही रस नाही. तडजोडीचा प्रश्नच नाही. पण हो माझ्या मुलांची कस्टडी मला हवी आहे, त्यांना मी लहानाचे मोठे केले आहे. माझी मुलं माझ्याजवळ राहावी, अशी माझी इच्छा आहे, असेही तिने सांगितले.