अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीचा कौटुंबिक वाद गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे, पण आता या प्रकरणात अभिनेत्याच्या अडचणी वाढत असल्याचे माहिती समोर येत आहे. नवाजुद्दीनची पत्नी आलियाने त्याच्या विरोधात बलात्कार आणि फसवणूकीचा आरोप केला आहे. ही तक्रार मुंबईतील वर्सोवा पोलिस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली आहे.
नवाजुद्दीनच्या पत्नीने त्याच्यावर लावले हे गंभीर आरोप
नवाजुद्दीन विरोधात लेखी तक्रार दिल्यानंतर आलियाच्या वकिलांनीही सांगितले की, "माझ्या क्लायंटने वर्सोवा पोलिस स्टेशनमध्ये फसवणूक, बलात्काराची सविस्तर लेखी तक्रार दाखल केली आहे." नवाजुद्दीन सिद्दीकीवर कलम 420 आणि 493 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवाजुद्दीनकडूनही न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून या दोघांमध्ये सुरू असलेला वाद समोर आला होता. एका आठवड्यापूर्वी आलियाने नवाजुद्दीन सिद्दीकीसह कुटुंबातील चार सदस्यांविरूद्ध तक्रार दाखल कली होती. उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगरच्या बुढाना पोलीस ठाण्यात तिचा जबाब नोंदवण्यात आला होता.
15 ते 16 वर्षे नवाजने माझ्यावर केले अत्याचार
एबीपी न्यूजच्या रिपोर्टनुसार एका मुलाखती दरम्यान आलिया म्हणाली, 2003 पासून मी नवाजुद्दीन सिद्दीकीला ओळखते. आम्ही एकत्र राहू लागलो. त्याचा भाऊ शामही आमच्याबरोबर राहायचा. मग, हळूहळू आम्ही प्रेमात पडलो. मग आम्ही लग्न केलं. सुरुवातीपासूनच आमच्यामध्ये काहीना काही खटके उडायचे. मला वाटले की वेळेनुसार हे थांबेल मात्र असे झाले नाही, 15 ते 16 वर्षे झाली आणि अत्याचार थांबले नाही या उलट ते आणखी वाढतचे गेले.'
गर्भवती असतानाही नवाज गर्लफ्रेंडसह वेळ घालवायचा
मी जेव्हा गर्भवती होते तेव्हा मी डॉक्टरकडे चेकअपसाठी स्वत: गाडी चालवत घेवून जायची. माझे डॉक्टर मला म्हणायचे की, मी वेडी आहे. प्रसूतीसाठी एकटी आली आहे. जेव्हा माझे लेबर पेन सुरु झाले, तेव्हा नवाज त्याच्या आईवडिलांकडेच होता.
पण जेव्हा मला त्रास होत होता तेव्हा नवाजने माझी साथ दिली नाही. जेव्हा जेव्हा मला त्याची गरज वाटायची तेव्हा तेव्हा तो आपल्या गर्लफ्रेंडशी फोनवर बोलत असायचा. मला याबद्दल सर्व काही माहित होते, कारण फोन बिलाचे स्टेटमेंट यायचे. ' यावरून नवाजचे बाहेरही अफेअर असल्याचे समजले होते.
भावाच्या मुलसही नवाज करायचा अश्लिल चाळे- आलियाचा आरोप
नवाजने आपल्या भावाच्या मुलीशी अश्लील चाळे केल्याचा आरोप केला होता. विरोध केल्यावर नवाज आणि त्याच्या कुटुंबीयांनी तिच्यावर ही घटना लपविण्यासाठी दबाव आणला होता. यासंदर्भात मुंबई पोलिसांनी जिल्हा एसएसपी यांना पत्र पाठवून माहिती मागवली होती.'