Join us

Vignesh Shivan सोबत लग्नानंतर नयनतारानं घेतला मोठा निर्णय, तुम्हीही कराल अभिनेत्रीचं कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2022 13:08 IST

Nayanthara-Vignesh Shivan साऊथ लेडी सुपरस्टार नयनताराने\गेल्या 9 जूनला दिग्दर्शक विग्नेश शिवनसोबत लग्नगाठ बांधली. त्यानंतर तिनेएक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

साऊथ लेडी सुपरस्टार नयनताराने (Nayanthara) गेल्या 9 जूनला दिग्दर्शक विग्नेश शिवनसोबत (Nayanthara-Vignesh Shivan) लग्नगाठ बांधली. तामिळनाडूच्या महाबलीपूरम येथे या जोडप्याचा शाही विवाहसोहळा पार पडला. नयनतारा तिची मॅरिड लाईफ एन्जॉय करते आहे. लग्नानंतर नयनताराने तिच्या आयुष्यातील महत्त्वाचे निर्णय घेतल्याचे वृत्त आहे. जाणून घ्या अभिनेत्रीच्या त्या निर्णयांबद्दल.

रिपोर्ट्सनुसार, नयनतारा आता चित्रपटांमधील इंटिमेट सीनपासून दूर राहणार आहे. नयनताराने तिच्या सहकलाकारांसोबत ऑनस्क्रीन रोमँटिक सीन न करण्याचा निर्णय घेतला आहे. बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, लग्नानंतर नयनतारा तिच्या डायरेक्टर पतीसोबत क्वालिटी टाइम घालवण्यासाठी ब्रेक घेणार आहे. ब्रेकवरून परतल्यानंतर नयनतारा इंटिमेट सीन करणार नाही. मात्र, या मुद्द्यावर नयनताराकडून ऑशियल स्टेटमेंट आलेलं नाही.

नयनताराचा आगामी चित्रपट जवान आहे ज्यामध्ये ती किंग खानसोबत दिसणार आहे. असं असलं तरी शाहरुख खान ऑनस्क्रीन इंटिमेट सीन्स करणं टाळतो. 

अभिनेत्रीच्या शाही लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले या शाही लग्नसोहळ्याला साऊथच्या अनेक दिग्गजांनी हजेरी लावली.नयनताराच्या लग्नात रजनीकांतपासून शाहरुख खानपर्यंतच्या अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. 

टॅग्स :नयनताराTollywood