Join us

अन्नपदार्थामधून नयनताराला इंफेक्शन; तातडीने रुग्णालयात झाली दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2022 2:00 PM

Nayanthara: अलिकडेच विग्नेशने मोठ्या प्रेमाने नयनतारासाठी एक पदार्थ तयार केला होता. हा पदार्थ खाल्ल्यामुळे नयनताराची प्रकृती बिघडली.

दाक्षिणात्य कलाविश्वातील लेडी सुपरस्टार या नावाने विशेष प्रसिद्ध असलेली अभिनेत्री म्हणजे नयनतारा (Nayanthara). काही दिवसांपूर्वीच दिग्दर्शक विग्नेश शिवन (Vignesh Shivan) याच्यासोबत लग्नगाठ बांधलेल्या नयनताराला नुकतंच रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. विग्नेशने तयार केलेला पदार्थ खाल्ल्यामुळे अचानकपणे नयनताराच्या प्रकृतीत बिघाड झाला आणि तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

अलिकडेच विग्नेशने मोठ्या प्रेमाने नयनतारासाठी एक पदार्थ तयार केला होता. हा पदार्थ खाल्ल्यामुळे नयनताराची प्रकृती बिघडली. तिला अचानकपणे उलट्या सुरु झाल्या. ज्यामुळे तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, योग्य उपचार घेतल्यानंतर काही तासांमध्येच तिला रुग्णालयातून डिस्चार्जही देण्यात आला.

सूत्रांच्या माहितीनुसार, विग्नेशने तयार केलेला पदार्थ खाल्ल्यानंतर नयनताराला त्वचेसंबंधित काही समस्या निर्माण झाली. कदाचित नयनताराला अॅलर्जी झाली असावी असं म्हटलं जात आहे. परंतु, योग्य उपचारानंतर तिला घरी सोडण्यात आलं.

दरम्यान, नयनतारा आणि विग्नेश यांनी काही महिन्यांपूर्वीच लग्नगाठ बांधली. ९ जून रोजी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत मोठ्या थाटात त्यांचा लग्नसोहळा पार पडला. जवळपास ६ वर्ष या जोडीने एकमेकांना डेट केलं त्यानंतर लग्नाचा निर्णय घेतला. 

टॅग्स :नयनतारासेलिब्रिटीTollywood