साऊथच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. तमीळ अभिनेत्री नयनतारा(Nayanthara)ने अभिनय सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्रीने वैयक्तिक आयुष्यावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. तिला पूर्णवेळ आई व्हायचे आहे. तिला तिच्या जुळ्या मुलांचे (उयर आणि उलागम) संगोपन करण्यावर लक्ष केंद्रित करायचे आहे. नयनतारा गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात सरोगसीद्वारे दोन मुलांची आई झाली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्री आपल्या मुलांच्या संगोपनावर लक्ष केंद्रित करताना पती विघ्नेशच्या प्रॉडक्शन हाऊस 'राउडी पिक्चर्स'ची काळजी घेणार आहे. म्हणजे अभिनयाला पूर्णपणे अलविदा करणार आहे. मात्र, नयनताराच्या बाजूने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया किंवा वक्तव्य आलेले नाही. ही बातमी चाहत्यांसाठी धक्कादायक आहे.
यासोबत नयनतारा 'लेडी सुपरस्टार ७५' सिनेमात झळकणार आहे. वास्तविक, नयनताराला 'लेडी सुपरस्टार' म्हटले जाते, पण तिच्यासोबत ७५ जोडले आहेत कारण हा अभिनेत्रीचा ७५वा चित्रपट असेल. नीलेश कृष्णा या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. यानंतर नयनताराकडे अल्फोन्स पुथरेनचा पटू चित्रपट आहे, ज्यामध्ये ती फहाद फाजीलसोबत दिसणार आहे. यासोबतच अजित कुमारसोबत एके ६२ आहे, ज्याचे दिग्दर्शन विघ्नेश सिवन स्वत: करत आहेत. नयनताराने पुरी जगन्नाध दिग्दर्शित आणखी एक चित्रपट साइन केला आहे, त्याचे नाव आहे 'ऑटो जानी'. याशिवाय नयनतारा 'नयनतारा: बियॉन्ड द फेयरीटेल' या लग्नाच्या चित्रपटात दिसणार आहे. यामध्ये नयनतारा आणि विघ्नेशच्या लग्नाची काही झलक दाखवण्यात येणार आहे, जी चाहत्यांसाठी एक अद्भुत अनुभव असेल.