Join us

सुशांतच्या घरून रियाने स्वतःच्या घरी कुरिअर केला होता अर्धा किलो गांजा, कारण...!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2020 9:13 AM

चौकशीत एनसीबीला रियाने सांगितले की, कुरिअर कंपनीतून हे पॅकेट पाठवण्यात आलं होतं जेणेकरून रिया आणि सुशांत पकडले जाऊ नये.

सुशांत सिंह राजपूत केसमध्ये ड्रग चॅट समोर आल्यांनंतर एनसीबीचा तपासही महत्वाचा ठरत आहे. एनसीबीला त्यांच्या तपासात आढळून आले की, लॉकडाऊन दरम्यान सुशांत सिंह राजपूतचा काही दिवस रिया चक्रवर्तीच्या घरी घालवायचे होते. यासाठी रिया आणि सुशांतने निर्णय घेतला की, एका फास्ट डिलिव्हरी कुरिअर कंपनीच्या माध्यमातून गांजा रियाच्या घरी पाठवला जावा. चौकशीतून ही बाब कन्फर्म झाली आहे.

एप्रिलमध्ये पाठवला होता गांजा

एका रिपोर्टनुसार, एनसीबीच्या चौकशीत रिया चक्रवर्ती, शौविक आणि इतरांच्या जबाबातून समजले की, सुशांत आणि रियानने घरच्या काही सामानासोबत एका बॉक्समध्ये जवळपास अर्धा किलो गांजा एप्रिल महिन्यात रियाच्या घरी पाठवला होता. तपासातून असेही समोर आले की, हे काम सुशांतकडे काम करणाऱ्या दीपेश सावंतने केलं होतं. त्याने कुरिअर कंपनीला हे सामान रियाच्या सांताक्रूज येथील फ्लॅटवर डिलीव्हर करण्यास सांगितले होते. रियाच्या घरी हे गांजाचं पॅकेट शौविकने रिसीव्ह केलं होतं.

कुरिअर बॉयने दीपेश सावंत आणि शौविकला ओळखले

चौकशीत एनसीबीला रियाने सांगितले की, कुरिअर कंपनीतून हे पॅकेट पाठवण्यात आलं होतं जेणेकरून रिया आणि सुशांत पकडले जाऊ नये. एनसीबी रियाच्या घरी हे पॅकेट डिलीव्हर करणाऱ्या कुरिअर बॉयचीही चौकशी केली. कुरिअर बॉयने दीपेश सावंत आणि शौविक चक्रवर्तीला ओळखले आहे. कुरिअरर बॉयचे कॉल डिटेल्सही घेण्यात आले आहेत.

दरम्यान, ईडीच्या चौकशीतून रिया आणि शौविकच्या मोबाइलमधून ड्रग चॅट समोर आल्यानंतर प्रकरण एनसीबीने हाती घेतलं होतं. लांबलचक चौकशीनंतर एनसीबीने रिया चक्रवर्ती, शौविक चक्रवर्ती दीपेश सावंत, सॅम्युअल मिरांडा जैद विलात्रा आणि वासित परिहार यांना ड्रग्स खरेदी-विक्रीच्या आरोपाखाली अटक केली. शुक्रवारी सर्व आरोपींचा जामिन अर्ज मुंबई सेशन कोर्टाने फेटाळून लावला. तर रियाला २२ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. सध्या रिया भायखळा तुरूंगात आहे.

बॉलिवूडमधील २५ जणांची नावे समोर

टाइम्स नाऊच्या रिपोर्टनुसार, काही बॉलिवूड सेलिब्रेटींची नावे ड्रग्समध्ये समोर आली आहेत. त्यांना एनसीबीने समन्स बजावला आहे. जवळपास २५ ए लिस्टर बॉलिवूड सेलिब्रेटीं असून यात अॅक्टर, डिरेक्टर, कास्टिंग डिरेक्टर, प्रोडक्शन हाउसेस आणि इतर लोकांचा समावेश आहे. हे ते लोक आहेत ज्यांनी ड्रग्स खरेदी, वापर आणि पेडलिंगमध्ये सहभाग घेतला आहे.

एनसीबी काळजीपूर्वक करणार कारवाई

या रिपोर्टमध्ये पुढे नमूद करण्यात आलंय की, यादीतील नावे खूपच प्रतिष्ठीत आहेत आणि म्हणूनच एनसीबी काळजीपूर्वक या प्रकरणात लक्ष ठेवत आहे. दिल्लीत सध्या केपीएस मल्होत्रा आणि एनसीबीचे डीजी अस्थाना यांच्या अध्यक्षतेखाली बैठक सुरू आहे. या बैठकीत ते पुढे कशी चौकशी सुरू ठेवणार आहेत यावर लक्ष केंद्रित करणार आहे.

हे पण वाचा :

रिया चक्रवर्तीने केला मोठ्या नावांचा खुलासा, कारवाईच्या तयारीत NCB

पर्दाफाश...रिया चक्रवर्ती ड्रग्ज घेत असतानाचा व्हिडीओच आला समोर !

आठ वर्षापूर्वी रियाने केले होते 'हे' ट्विट, पुन्हा होतंय व्हायरल, जाणून घ्या यामागचे कारण ?

टॅग्स :रिया चक्रवर्तीसुशांत सिंग रजपूतअमली पदार्थ