बॉलिवूड ड्रग्स कनेक्शनबाबत नायकोटिक्स कंट्रोल ब्युरो वेगाने तपास करत आहे आणि अनेक मोठ्या सेलिब्रिटींची चौकशी करत आहे. एनसीबीने शुक्रवारी धर्मा प्रॉडक्शनच्या क्षितिज प्रसादची चौकशी केली आणि रात्री उशीरा त्याला ताब्यात घेतलं. यानंतर लगेच दिग्दर्शक-निर्माता करण जोहर याने यावर स्पष्टीकरण जारी केलं.
एनसीबीच्या टीमने शुक्रवारी अभिनेत्री रकुलप्रीत सिंहला चौकशीसाठी बोलवलं होतं. यादरम्यान तिने धर्मा प्रॉडक्शनचा असिस्टंट डिरेक्टर क्षितिज प्रसादचं नाव घेतलं. असेही सांगितले जात आहे की, रकुलप्रीतने ४ सेलिब्रिटींची नावे घेतली आहेत. ज्यांना क्षितिज ड्रग्स सप्लाय करत होता. त्यासोबत एनसीबीने शुक्रवारी क्षितिज प्रसादच्या घरी छापा मारून ड्रग्स ताब्यात घेतलं.
एनसीबीच्या चौकशीदरम्यान क्षितिजने धर्मा प्रॉडक्शनसोबत काम केलेला त्याचा मित्र आणि असिस्टंट डिरेक्टर अनुभव चोप्राचं नाव घेतलं. त्यानंतर अनुभव चोप्राचीही चौकशी करण्यात आली. आता एनसीबीने क्षितिज चोप्राला ताब्यात घेतलं असून अनुभव चोप्राला घरी जाऊ दिलं. दोघांनाही करण जोहरच्या पार्टीबाबत विचारण्यात आलं.
क्षितिज प्रसादला ताब्यात घेतल्यानंतर करण जोहरने सोशल मीडियावर प्रेस नोट जारी करून स्पष्टीकरण दिलं. त्याने लिहिलं की, 'काही न्यूज चॅनल्स, प्रिंट/इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म चुकीची माहिती प्रकाशित करत आहेत की, मी माझ्या घरी २८ जुलै २०१९ ला आयोजित केलेल्या पार्टीत ड्रग्सचं सेवन केलं गेलं. मी आधीही सांगितलं आहे की, हे सगळे आरोप चुकीचे आहेत. मी पुन्हा सांतो की, हे आरोप निराधार आणि खोटे आहेत. पार्टीत कोणत्याही प्रकारच्या मादक पदार्थांच सेवन केलं गेलं नव्हतं. मी ना नशेच्या पदार्थांच सेवन करत ना त्यांना प्रमोट करत'.
करण जोहरने पुढे लिहिले की, 'या सर्व बातम्या आणि लेखांमुळे मला, माझ्या परिवाराला आणि सहकाऱ्यांना, धर्मा प्रॉडक्शनला अनावश्क घृणा, गमतीचा विषय बनवलं आहे. अनेक मीडिया/न्यूज चॅनल्स रिपोर्ट दाखवत आहे की, क्षितिज प्रसाद आणि अनुभव चोप्रा माझे सहकारी आहेत. पण मी लोकांना वैयक्तिकपणे ओळखत नाही आणि ते माझे सहकारी किंवा जवळचे नाहीत. तसेच हे लोक वैयक्तिक आयुष्यात काय करतात यासाठी धर्मा प्रॉडक्शन जबाबदार नाही'.
करण जोहर पुढे म्हणाला की, 'अनुभव चोप्रा हा धर्मा प्रॉडक्शनचा कर्मचारी नाही. तो नोव्हेंबर २०११ आणि जानेवारी २०१२ दरम्यान आणि जानेवारी २०१३ मध्ये शॉर्ट फिल्मसाठी सहायक दिग्दर्शक म्हणून दोन महिन्यांसाठी काम करत होता. त्यानंतर त्याने धर्मा प्रॉडक्शनसाठी कधीही काम केलं नाही. तर क्षितिज रवि प्रसाद हा धर्मा प्रॉडक्शनची सिस्टर कंपनी धर्मटिक एन्टरटेन्मेंटच्या एका प्रोजेक्टसाठी कॉन्ट्रॅक्ट बेसवर कार्यकारी निर्माता म्हणून नोव्हेंबर २०१९ पासून जोडला गेला होता. पण तो प्रोजेक्ट झालाच नाही. काही दिवसांपासून मीडियाने खोट्या आरोपांचा आधार घेतला. मला आशा आहे की मीडियातील लोक संयम ठेवतील. नाही तर माझ्याकडे माझ्यावर होत असलेल्या खोट्या आरोपांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा पर्याय शिल्लक राहील'.
श्रद्धा कपूरच्या नावे कारमध्ये सप्लाय व्हायचे ड्रग्ज, करमजीतने साराबद्दलही केला मोठा खुलासा!!
NCBच्या रडारवर आता करण जोहरची 'ती' पार्टी, ड्रग्सचा वापर केल्याचा संशय
होय, मीच रियासोबत ड्रग्जबद्दल चॅट केलं, पण...; रकुल प्रीतकडून ब्लेमगेम सुरू?