Join us

दीपिका, सारा, श्रद्धासह ७ जणांना एनसीबीकडून समन्स; तीन दिवसांत हजर राहावं लागणार

By कुणाल गवाणकर | Published: September 23, 2020 6:01 PM

ड्रग्ज प्रकरणात बड्या अभिनेत्रींची नावं; एनसीबी चौकशी करणार

मुंबई: सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात ड्रग्ज कनेक्शन समोर आल्यानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं (एनसीबी) वेगवान कारवाई सुरू केली. अभिनेत्री दीपिका पादुकोण, सारा अली खान, रकुल प्रीत सिंह आणि श्रद्धा कपूर यांना एनसीबीनं समन्स बजावलं आहे. या अभिनेत्री ड्रग्ज मागवत असल्याची माहिती एनसीबीच्या हाती लागली आहे. त्यामुळे आता एनसीबीकडून त्यांची चौकशी केली जाणार आहे. पुढील ३ दिवसांत या अभिनेत्रींना चौकशीसाठी हजर राहावं लागणार आहे. आतापर्यंत एनसीबीनं या प्रकरणात १८ जणांना अटक केली आहे.सुशांत सिंहच्या मृत्यू प्रकरणाचा तपास करताना त्याची प्रेयसी रिया चक्रवर्ती ड्रग्ज मागवत असल्याची माहिती समोर आली. यानंतर एनसीबीच्या तपासात बॉलिवूडमधील अनेक बड्या कलाकारांची नावं समोर आली. ड्रग्ज प्रकरणात गेल्या काही दिवसांपासून दीपिका पादुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर आणि रकुल प्रीत सिंह यांची नावं पुढे आली होती. या सर्व अभिनेत्रींना आज एनसीबीनं समन्स पाठवलं. दीपिका पादुकोणसोबत करिश्मा गोव्यात?, एनसीबीच्या समन्सवर दिले होते हे कारणएनसीबीनं आज एकूण सात जणांना समन्स पाठवलं आहे. दीपिका पादुकोण व्हॉट्स चॅटच्या माध्यमातून ड्रग्ज मागवत असल्याची माहिती काही दिवसांपूर्वीच समोर आली. क्वान कंपनीच्या करिश्मा प्रकाशसोबत व्हॉट्स ऍपवर बोलत असताना तिनं ड्रग्ज मागितलं होतं. दीपिका सध्या गोव्यात आहे. तर दीपिका जिच्यासोबत चॅट करत होती ती करिश्मादेखील चित्रीकरणासाठी गोव्यातच आहे. करिश्मालादेखील चौकशीसाठी एनसीबीनं समन्स पाठवलं आहे. कामगार मंत्रालयाकडून दीपिकाचा 'तो' फोटो रिट्विट; थोड्याच वेळात केला डिलीटसारा अली खानदेखील सध्या गोव्यातच आहे. साराची आई अमृता सिंहचं घर गोव्यात आहे. सारा सध्या आईच्या घरी आहे. रिया चक्रवर्तीनं चौकशीदरम्यान सर्वप्रथम साराचं नाव घेतलं होतं. समन्स बजावण्यात आलेल्या अभिनेत्रींविरोधात ठोस पुरावे असल्याची माहिती एनसीबीनं दिली. या प्रकरणी एनसीबीनं रियासह अनेकांचे जबाब नोंदवले आहेत. अभिनेत्रींविरोधात पुरावे गोळा करण्यासाठी एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी ड्रग्जचा पुरवठा करणाऱ्यांचीही चौकशी केली.

टॅग्स :दीपिका पादुकोणसारा अली खानश्रद्धा कपूररकुल प्रीत सिंगरिया चक्रवर्तीदीया मिर्झासुशांत सिंग रजपूत