‘थ्री इंडियट्स’मधील खऱ्या ‘फुंसुक वांगडु’ला १४ कोटींच्या मदतीची गरज!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2018 3:40 PM
‘थ्री इडियट्स’ या सुपरहिट चित्रपटात मिस्टर परफेक्टनिस्ट आमिर खानच्या ‘फुंसुक वांगडु’ या भूमिकेपासून प्रेरित झालेल्या खºया सोनम वांगचुकला दुर्गम ...
‘थ्री इडियट्स’ या सुपरहिट चित्रपटात मिस्टर परफेक्टनिस्ट आमिर खानच्या ‘फुंसुक वांगडु’ या भूमिकेपासून प्रेरित झालेल्या खºया सोनम वांगचुकला दुर्गम क्षेत्रातील एका विश्वविद्यालयात पाठ्यक्रम चालविण्यासाठी १४ कोटी रुपयांच्या मदतीची गरज आहे. त्याचे हे विश्वविद्यालय कौशल्य आधारित प्रशिक्षण देणार आहे. वास्तविक या संपूर्ण प्रक्रियेसाठी सुमारे ८०० कोटी रुपये खर्च येणार आहे. परंतु पाठ्यक्रम चालविण्यासाठी केवळ १४ कोटी रुपयांची गरज आहे. यातील सात कोटी रुपये सीएसआरमधून तर उर्वरित सात कोटी रुपये क्राउंड फंडिंगमधून गोळा करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. क्राउड फंडिंगमधून आतापर्यंत वांगचुकने ४.६ कोटी रुपये गोळा केले आहेत. वांगचुक बºयाच काळापासून लडाख भागात शैक्षणिक सुविधा आणि स्थानिक मुलांना काही परीक्षांमध्ये यशस्वी करण्यासाठी काम करीत आहेत. आता ते असे काही करू इच्छितात, जेणेकरून त्याचा फायदा थेट मुलांना होईल. याविषयी वांगचुक यांनी सांगितले की, लडाख क्षेत्रातील फयांग या दºयाखोºयांच्या भागात २०० एकरवर पसरलेल्या जमिनीवर हा प्रोजेक्ट बांधण्यात येणार आहे. या विश्वविद्यालयाचे नाव हिमालयन इन्स्टिट्यूट आॅफ अल्टनेटिव्स लड्डाख असे ठेवण्यात आले आहे. या अगोदर छोट्या पडद्यावरील चर्चित शो ‘कौन बनेगा करोडपती’मध्येही वांगचुक यांनी महानायक अमिताभ बच्चन यांच्यासमोर याविषयीचा उल्लेख केला होता. वांगचुक यांनी या प्रोजेक्टसाठी गेल्यावर्षापासूनच क्राउड फंडिंग गोळा करण्यास सुरुवात केली असल्याचे सांगितले होते. वांगचुकने म्हटले होते की, ‘पहिल्या टप्प्यात आम्ही मार्च-एप्रिल २०१८ मध्ये इंटीग्रेटेड माउंटेन डेव्हलपमेंट कोर्स सुरू करण्याची तयारी करीत आहोत. याकरिता आम्हाला १४ कोटी रुपयांची आवश्यकता आहे. यातील सात कोटी रुपये २६ जानेवारी २०१८ पर्यंत क्राउड फंडिंगच्या माध्यमातून गोळा करण्याचे आमचे लक्ष्य आहे.दरम्यान, वांगचुकच्या या अभियानात काही शाळकरी मुलांनीही योगदान दिले आहे. यामध्ये गुडगाव येथील अर्जुन राजावत या शाळकरी मुलाने अभियान चालवून एक लाख रुपये गोळा करून दिले. अशाप्रकारे मुंबई येथील एका शाळेनेही विविध उपक्रम राबवून दोन लाख दिले.