नील नितीन मुकेश दिसणार मधूर भांडारकर यांच्या ‘इंदू सरकारमध्ये’
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2016 8:27 PM
बॉलिवूड अभिनेता नील नितीन मुकेश सुमारे वर्षभरानंतर चित्रपटात झळकणार आहे. दिग्दर्शक मधूर भांडारकर यांच्या आगामी चित्रपटात नील नितीन मुकेश ...
बॉलिवूड अभिनेता नील नितीन मुकेश सुमारे वर्षभरानंतर चित्रपटात झळकणार आहे. दिग्दर्शक मधूर भांडारकर यांच्या आगामी चित्रपटात नील नितीन मुकेश महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. भारतात लावण्यात आलेल्या आणीबाणीवर हा चित्रपट असेल असे सांगण्यात येते. वास्तववादी चित्रपटांची निर्मिती करण्यासाठी प्रसिद्ध असलेले दिग्दर्शक मधूर भांडारकर यांनी ‘इंदू सरकार’ या चित्रपटाची तयारी सुरू केली आहे. या चित्रपटाचे तात्पुरते नाव ‘इंदू सरकार’ असे ठेवण्यात आले आहे, नंतर हे नाव बदलण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते. सन 1975 ते 1977 या काळात सरकारने लावलेल्या आणिबाणीवर हा चित्रपट असेल. यात संजय गांधी यांच्या सारखी भूमिका नील साकारणार असल्याचे सांगण्यात येते. या चित्रपटात तथ्य आणि काल्पनिकता यांचा मिलाफ असेल. }}}} अमिताभ बच्चन व तापसी पन्नू यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘पिंक’ या चित्रपटातील कार्ती कुल्हारी हिची या चित्रपटात प्रमुख भूमिका असेल. या चित्रपटाचे शूटिंग डिसेंबर महिन्यापासून सुरू होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. वर्षभरानंतर हा चित्रपट प्रदर्शित होईल असे मानले जात आहे. यापूर्वी मधूर भांडारकर यांच्या जेल या चित्रपटात नीलने प्रमुख भूमिका साकारली होती. निर्दोश नायक जेलच्या वातावरणात न्यायाच्या प्रतिक्षेत असल्याचे दाखविण्यात आले होते. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या सूरज बडजात्या यांच्या ‘प्रेम रतन धन पायो’ या चित्रपटात नील दिसला होता. त्याने या चित्रपटात नकारात्मक भूमिक ा केली होती. पारंपारिक ठेवणीतील त्याची भूमिका असली तरी समीक्षकांनी व प्रेक्षकांनी त्याच्या अभिनयाची प्रशंसा केली होती. मात्र याचा त्याला फार फायदा झाला नाही. दरम्यानच्या काळात तो दाक्षिणात्य चित्रपटात काम करीत आहे अशाही बातम्या आला होत्या.